PAKच्या परराष्ट्र राज्यमंत्र्यांनी घेतली अफगाण सरकारची भेट, हिजाबशिवाय पोहोचल्या हिना

विशेष बाब म्हणजे, महिलांना चार भिंतींच्या आत आणि हिजाबमध्ये कैद ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तालिबान सरकारचे अधिकारी हिना यांचे स्वागत करण्यासाठी काबूल विमानतळावर पोहोचले. तेव्हा त्या आपल्या ग्लॅमरस स्टाईलमध्ये होत्या. यावेळी हिजाब घालणे तर दूरच त्यांनी डोक्यावर स्कार्फही ओढलेला नव्हता.

    नवी दिल्ली – पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमेवर जवळपास गेल्या ६ महिन्यांपासून प्रचंड तणाव आहे. अलीकडेच तालिबानच्या गोळीबारात ६ पाकिस्तानी सैनिक मारले गेले. हा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानच्या परराष्ट्र राज्यमंत्री हिना रब्बानी खार या मंगळवारी अफगाणिस्तानला पोहोचल्या. त्यांच्यासोबत परराष्ट्र आणि संरक्षण मंत्रालयातील अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ होते.

    विशेष बाब म्हणजे, महिलांना चार भिंतींच्या आत आणि हिजाबमध्ये कैद ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तालिबान सरकारचे अधिकारी हिना यांचे स्वागत करण्यासाठी काबूल विमानतळावर पोहोचले. तेव्हा त्या आपल्या ग्लॅमरस स्टाईलमध्ये होत्या. यावेळी हिजाब घालणे तर दूरच त्यांनी डोक्यावर स्कार्फही ओढलेला नव्हता.

    अफगाणिस्तानमध्ये महिलांवर कडक निर्बंध आहेत आणि जगात याला तीव्र विरोध होत आहे. यामुळेच तालिबान राजवटीला एक वर्ष होऊनही आजपर्यंत कोणत्याही देशाने मान्यता दिलेली नाही. येथे मुलींना शाळा-कॉलेजात जाण्यास बंदी आहे. त्यांना तालीम हक्क म्हणजेच शिक्षणाचा अधिकार देण्यात आलेला नाही. ती बाजारात किंवा इतर कोणत्याही ठिकाणी गेली तर तिच्यासोबत एक पुरुष पालक असणे आवश्यक आहे.

    अशा वातावरणात हिना रब्बानी खार या मंगळवारी काबूल विमानतळावर उतरल्या. तेव्हा त्यांची स्टाइल सोशल मीडियावर व्हायरल झाली. हिजाब घालणे तर दूरच, त्यांच्या डोक्यावर साधा स्कार्फही नव्हता. यानंतर त्या शिष्टमंडळ स्तरावरील चर्चेसाठी परराष्ट्र मंत्रालयात पोहोचल्या. तेव्हा त्यांनी तालिबान नेत्यांसमोर बसून चर्चा केली. यादरम्यान त्तयांनी बुरखा घातलेला नव्हता.