अफगाणिस्तानवर पाकिस्तानचा हल्ला, ९ नागरिकांचा मृत्यू

  • पाकिस्तानी सैन्याने केलेल्या हल्ल्यात ९ नागरिकांचा मृत्यू झाला असून ५० हून अधिक लोकं जखमी झाले आहे. त्यामुळे पाकिस्तानी हल्ल्यानंतर अफगाणिस्तान सैन्य देखील सज्ज झाले आहेत.

काबूल: अफगाणिस्तानच्या कंधार प्रांतातील स्पिन बोल्दक जिल्ह्यात एका नागरी वस्त्यांमध्ये पाकिस्तानी सैन्याने रॉकेट हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानी सैन्याने केलेल्या हल्ल्यात ९ नागरिकांचा मृत्यू झाला असून ५० हून अधिक लोकं जखमी झाले आहे. त्यामुळे पाकिस्तानी हल्ल्यानंतर अफगाणिस्तान सैन्य देखील सज्ज झाले आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, अफगाण सैन्यांना पाकिस्तानी सैन्याविरूद्ध कारवाई करण्यासाठी पूर्णपणे तयार राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अफगाणिस्तान लष्करप्रमुख जनरल मोहम्मद यासीन जिया लेवी यांनी पाकिस्तानविरुद्ध कारवाई करण्यासाठी सर्व सैन्य दलाला तयार राहण्याचे आदेश दिले आहेत. पाकिस्तानी लष्कराने अफगाणिस्तानच्या भूप्रदेशावर रॉकेट हल्ला सुरूच ठेवला तर अफगाण सैन्यदलाकडून त्याला प्रत्युत्तर देण्यात येणार असल्याचेही अफगाणिस्तान सरकारने स्पष्ट केले आहे. 

दरम्यान, अफगाणिस्तानमध्ये गुरुवारी संध्याकाळी एका कारमध्ये बॉम्बस्फोट झाला. त्यामुळे या स्फोटात ८ जणं ठार झाले असून ३० हून अधिकजण जखमी झाले. तसेच हा बॉम्बस्फोट लोगार प्रातांत झाला. परंतु या हल्ल्यामागे तालिबानचा हात असल्याचे म्हटलं जात आहे.