‘नागरिकांनो चहा कमी प्या’, पाकिस्तानच्या केंद्रीय मंत्र्याचे आवाहन

माध्यमांशी संवाद साधताना एहसान इक्बाल यांनी लोकांना अर्थव्यवस्था वाचवण्याचे आवाहन केले आणि मी देशाला एक कप चहा कमी पिण्याचे आवाहन करणार असल्याचे सांगितले. एहसान हे नियोजन, विकास आणि विशेष प्रोत्साहनांचे प्रमुख आहेत.

    नवी दिल्ली – पाकिस्तानची अर्थव्यवस्था पूर्णपणे डबघाईला आली आहे. शाहबाज सरकार चीन, सौदी अरेबियासारख्या देशांकडून कर्जाच्या शोधात आहे. यासोबतच इस्लामाबाद आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडूनही मदतीची अपेक्षा करत आहे. दरम्यान, पाकिस्तान सरकारच्या एका मंत्र्याने सर्वसामान्यांना चहाचे सेवन कमी करण्याचे आवाहन केले आहे.

    माध्यमांशी संवाद साधताना एहसान इक्बाल यांनी लोकांना अर्थव्यवस्था वाचवण्याचे आवाहन केले आणि मी देशाला एक कप चहा कमी पिण्याचे आवाहन करणार असल्याचे सांगितले. एहसान हे नियोजन, विकास आणि विशेष प्रोत्साहनांचे प्रमुख आहेत.

    पाकिस्तान सरकार ६.४ अब्ज डॉलरचे कर्ज फेडणार का?
    पाकिस्तान आर्थिक संकटाच्या उंबरठ्यावर आहे. पाकिस्तान दीर्घकाळापासून दहशतवादाशी झुंज देत आहे आणि आता आर्थिक संकटही समोर आहे. पाकिस्तानचा जवळचा मित्र चीनही पाकिस्तानला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यात अपयशी ठरला आहे. शाहबाज सरकार पुढील तीन वर्षांत $६.४ अब्ज कर्ज फेडून आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने निश्चित केलेल्या बेलआउट मानदंडांची पूर्तता करण्याचा प्रयत्न करत आहे.