कंगाल पाकिस्तानची अवस्था इतकी वाईट की सैनिकांचही पोट भरु शकत नाही? त्यांच्या अन्न निधीत केली कपात

अहवालात नमूद करण्यात आले आहे की, पाकिस्तान सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करणे, परदेशी मोहिमांची संख्या कमी करणे आणि इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स (ISI) आणि इंटेलिजन्स ब्युरो (IB) यांना देण्यात येणारा गुप्त निधी मर्यादित करणे यासह अनेक विचार करत आहे.

दिल्ली : पाकिस्तानमध्ये (Pakistan) इंधनाचे दर गगनाला भिडल्याने पाकिस्तानमधील आर्थिक संकट (Pakistan Economic Crisis) वाढत आहे. दुसरीकडे, अमेरिकन डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपया विक्रमी नीचांकी पातळीवर आला आहे. त्यामुळे आधीच गगनाला भिडलेली महागाई  (Inflation) आणखी वाढली आहे. स्टेट बँक ऑफ पाकिस्तानने व्याजदरात आणखी वाढ केली आहे. आता पाकिस्तान सरकारने सामान्य जनतेपासून संपूर्ण देशावर कर वाढवला आहे, आता पाकिस्तानच्या सैन्यात काम करणारे सैनिकही यापासून अस्पर्श राहिलेले नाहीत. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानमधील लष्कराच्या मेसमध्ये अन्नाचा तुटवडा निर्माण झाला आहे.

फील्ड कमांडर्सनी मास्टर जनरलला पत्र लिहिले असुन त्यात म्हण्टलय की,  देशाच्या विशेष निधीत कपात केल्यामुळे, वाढत्या महागाईत लष्कराला दोनवेळचे अन्न नीट मिळत नाही आहे. फील्ड कमांडर्सनी क्वार्टर मास्टर जनरलच्या कार्यालयाला पत्र लिहून अन्नाचा तुटवडा झाल्याचं सांगितलं आहे. अहवालात म्हटले आहे की लष्करी अधिकार्‍यांनी अन्नपुरवठा आणि अन्नधान्याच्या मुद्द्यांवर लॉजिस्टिक स्टाफचे प्रमुख आणि मिलिटरी ऑपरेशन्सचे महासंचालक यांच्याशी चर्चा केली आहे. लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांच्याकडेही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. या अहवालात एका सूत्राचा हवाला देऊन म्हटले आहे की, आम्ही सैनिकांच्या अन्न निधीत कपात केली आहे, जी जनरल राहिल शरीफ यांनी 2014 मध्ये ऑपरेशन जरब-ए-अझब दरम्यान दुप्पट केली होती.

अहवालात नमूद करण्यात आले आहे की, पाकिस्तान सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करणे, परदेशी मोहिमांची संख्या कमी करणे आणि इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स (ISI) आणि इंटेलिजन्स ब्युरो (IB) यांना देण्यात येणारा गुप्त निधी मर्यादित करणे यासह अनेक विचार करत आहे.   या उपाययोजनांचा सरकारच्या कामकाजावर मोठा परिणाम होत असल्याचे सांगत. पाकिस्तानमध्ये किंमती वाढल्याच त्यांनी सांगितलं. दरम्यान,  डॉनने दिलेल्या वृत्तानुसार पाकिस्तान पाच महिन्यांत प्रथमच महागाई 40% पेक्षा जास्त झाली आहे. पाकिस्तान ब्युरो (PBS) कडील डेटा असे दर्शवितो की आठवडा-दर-आठवड्यातील महागाईत किंचित घट होऊनही जीवनावश्यक वस्तू महाग राहतील.