इम्रान खान यांनी पॅलेस्टाईन आणि काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला असून या मुद्द्यांवर आपण अपयशी ठरलो आहोत, असे म्हटले आहे. त्यांच्यासाठी आपण काहीही करू शकलो नाही, हे सांगताना खेद वाटतो. जगातील शक्तिशाली देश आपल्याला गांभीर्याने घेत नाहीत. आपण आपल्यातच विखुरलेले आहोत आणि त्यांना हे माहीत आहे.
नवी दिल्ली – इस्लामिक सहकार्य संघटनेची (OIC) बैठक पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे होत आहे. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी या बैठकीला विशेष अतिथी म्हणून उपस्थित आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी या सभेला संबोधित केले. यादरम्यान त्यांनी ओआयसीबाबतही चर्चा केली आहे.
इम्रान खान यांनी पॅलेस्टाईन आणि काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला असून या मुद्द्यांवर आपण अपयशी ठरलो आहोत, असे म्हटले आहे. त्यांच्यासाठी आपण काहीही करू शकलो नाही, हे सांगताना खेद वाटतो. जगातील शक्तिशाली देश आपल्याला गांभीर्याने घेत नाहीत. आपण आपल्यातच विखुरलेले आहोत आणि त्यांना हे माहीत आहे.
आमची लोकसंख्या दीडशे कोटी आहे, पण आमचा आवाज कोणी ऐकत नाही, असे इम्रान खान यांनी म्हटले आहे. आम्ही फक्त काश्मीर आणि पॅलेस्टाईनमधील सामान्य लोक आणि मानवी हक्कांबद्दल बोलत आहोत. आंतरराष्ट्रीय संस्थांचे नियम त्या लोकांच्या बाजूने आहेत. युनायटेड नेशन्ससारख्या संस्था त्यांच्या हक्कांच्या समर्थनार्थ आहेत. या संघटनांना सार्वमत हवे आहे जेणेकरून तेथील लोक स्वतःचे भविष्य निवडू शकतील, परंतु हे अधिकार अद्याप त्यांना दिलेले नाहीत.