PAK पंतप्रधानांचा ऑडिओ लीक, शाहबाज शरीफ यांच्या घरातील संभाषण व्हायरल

घरी होणाऱ्या बैठकांच्या ऑडिओ क्लिप ऑनलाईन लीक होत आहेत. सद्या सोशल मीडियावर पंतप्रधानांच्या बंगल्यात झालेल्या बैठकांतील निर्णयांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. तसेच पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचा आणि एका अधिकाऱ्यांच्या संभाषणाचा कथित ऑडिओही समोर आला आहे.

    नवी दिल्ली – पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे घरही सुरक्षित नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कारण, त्यांच्या घरी होणाऱ्या बैठकांच्या ऑडिओ क्लिप ऑनलाईन लीक होत आहेत. सद्या सोशल मीडियावर पंतप्रधानांच्या बंगल्यात झालेल्या बैठकांतील निर्णयांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. तसेच पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचा आणि एका अधिकाऱ्यांच्या संभाषणाचा कथित ऑडिओही समोर आला आहे. या ऑडिओत माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांची मुलगी मरियम नवाज यांचा हवाला देत भारताचा उल्लेख करण्यात आला आहे.

    पाकिस्तानातील सर्वात मोठ्या वृत्तवाहिनी ‘जिओ न्यूज’ ने एका रिपोर्टमध्ये या प्रकरणाचा खुलासा केला आहे. रिपोर्टनुसार- वजीर-ए-आझम यांच्या घरी होणाऱ्या बैठकीचा ऑडिओ लीक झाला आहे. तर यावरून देशाची सुरक्षा किती मजबूत आहे, हे समजू शकते. समोर आलेल्या ऑडिओ लीकमध्ये इम्रान खान यांचा पक्ष पीटीआयला सामोरे जाण्याच्या रणनीतीवर विचार केला जात आहे. यामध्ये अनेक मंत्र्यांचे आवाज ओळखता येतील. ही ऑडिओ क्लिप आता ऑनलाईन उपलब्ध आहे. माध्यमांच्या अहवालानुसार, या ऑडिओ क्लिपमध्ये पंतप्रधान शाहबाज शरीफ, गृहमंत्री राणा सनाउल्ला, संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांच्यासह इतर काही नेत्यांचा आवाज आहे.