
पाकिस्तान पुढील सात दिवसांत अधिक पेट्रोलियम उत्पादने खरेदी करू शकणार नाही हे अत्यंत दुर्दैवी आहे. असं साजिद तरार यांनी म्हण्टलं आहे.
पाकीस्तान : पाकीस्तानमधील (pakistan financial crisis) परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत आहे. 1947 मध्ये भारतापासून वेगळे झालेला पाकिस्तान आज पूर्णपणे विघटनाच्या मार्गावर आहे. भीषण आर्थिक संकटाने वेढलेल्या या देशाला आता अवघे काही दिवस उरले आहेत. आपला देश लवकरच श्रीलंकेसारखा (Shrilanka) गरीब होईल अशी भीती आता व्यक्त करण्यात येत आहे. अलीकडे समोर आलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानकडे परकीय चलनाच्या साठ्यात फक्त $4.3 अब्ज शिल्लक आहेत, म्हणजेच देशात फक्त तीन आठवड्यांचा पैसा शिल्लक आहे. या देशाचा खेळ अवघ्या सात दिवसांत संपणार आहे. असं म्हण्टलंय अमेरिकेत स्थायिक झालेले पाकिस्तान वशांचे साजिद तरार यांनी.
काय म्हणाले साजिद तरार
साजिद तरार यांनी ट्विट करत म्हण्टलंय की, ‘पाकिस्तान पुढील सात दिवसांत अधिक पेट्रोलियम उत्पादने खरेदी करू शकणार नाही हे अत्यंत दुर्दैवी आहे. अशाने आता पाकिस्तानचा खेळ संपेल. श्रीलंकेत जसे घडले तसेच सर्व काही घडणार आहे.
कोण आहेत साजिद तरार
सध्या अमेरिकन असलेले साजिज तररा मुळच्या पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील मंडी बहाउद्दीनचे रहिवासी आहेत. साजिद हे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे समर्थक आहे. साजिद आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यास करण्यासाठी अमेरिकेत गेले आणि नंतर इथेच स्थायिक झाले. ते अनेकदा पाकिस्तान सरकारच्या धोरणांवर टीका करतात आणि त्या धोरणांमुळेच आज देशाची ही स्थिती आहे असे त्यांचे मत आहे.
Its an unfortunate reality that if Pakistan is not able to buy more petroleum products within the next 7 days. The game is over. Everything will come down like Sri lank. Dual citizens are still busy looting, and the nation is sleeping.
— Sajid N. Tarar (@sajidtarar) January 23, 2023
पाकिस्तानात परिस्थिती गंभीर
6 जानेवारीच्या एका अहवालात असे म्हटले होते की देशाचा चलन साठा दशकानंतर सर्वात कमी पातळीवर आहे. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपयाचे मूल्य 20 टक्क्यांनी घसरले आहे. पाकिस्तान सरकार लवकरच मिनी बजेट सादर करणार आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) उपस्थित केलेल्या चिंतेचा या अर्थसंकल्पात उल्लेख केला जाईल. या चिंतेमुळेच पाकिस्तानला बेलआउट पॅकेज मिळत नाही. या अटींची पूर्तता झाल्यावरच बेलआउट पॅकेज मिळू शकेल, असे आयएमएफचे म्हणणे आहे.
अधिक समस्या वाढतील
पाकिस्तानी वृत्तपत्र ‘द डॉन’ने दिलेल्या वृत्तानुसार, आयएमएफच्या अटी लागू केल्यास सर्वसामान्यांच्या अडचणी दुपटीने वाढतील, असे बहुतांश लोकांचे मत आहे. त्यांच्या मते, आयएमएफच्या प्रस्तावानंतर देशातील महागाई आणखी वाढेल. आधीच व्याजदर गगनाला भिडले आहेत आणि महागाई नियंत्रणाबाहेर आहे. युक्रेनमधील युद्धामुळे जागतिक अर्थव्यवस्थेचा वेग मंदावण्याबरोबरच दैनंदिन वस्तूही महाग झाल्या आहेत. डॉनच्या वृत्तानुसार, सरकारने आधीच विजेच्या दरात 30 टक्के आणि गॅसच्या किमती 60 ते 70 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय नवीन कर दरही लागू केले जाऊ शकतात. यासोबतच व्याजदरात आणखी वाढ करण्याचीही तयारी सुरू आहे.