pakistani barber

पाकिस्तानच्या(pakistan) अनोख्या हेअर ड्रेसरचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. व्हायरल(viral video) झालेल्या या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, अली अब्बास(ali abbas) नावाचा माणूस लोकांच्या केसांमध्ये आधी आग लावतो. त्यानंतर कात्रीने केसांना आकार देतो. व्हिडिओमध्ये अली अब्बास चॉपर, हातोडी(man using chopper and fire for hair cutting) अशा वस्तूंचा वापर केस कापण्यासाठी करतो.

    लाहोर:पाकिस्तानातल्या(Pakistan) एका सलूनमधला हेअर ड्रेसर(barber with different hair cutting style) सध्या सोशल मीडियावर खूप लोकप्रिय झाला(viral video)आहे. हा माणूस इतर सलूनमध्ये लोकांप्रमाणे केस कापत नाही. केस कापण्यासाठी तो चक्क चाकू, आग (video viral on social media)आणि हातोडीचा वापर करतो.

    आश्चर्याची बाब म्हणजे न घाबरता या माणसाकडे केस कापायला येतात. या माणसाच केस कापण्याचं कौशल्य इतकं चांगलं आहे की, विचित्र पद्धतीने केस कापूनही कोणाला साधे खरचटत सुद्धा नाही. या माणसाकडून केस कापून घेण्यासाठी लोक रोज रांगा लावतात. या अनोख्या हेअर ड्रेसरचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

    व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, अली अब्बास नावाचा माणूस लोकांच्या केसांमध्ये आधी आग लावतो. त्यानंतर कात्रीने केसांना आकार देतो. व्हिडिओमध्ये अली अब्बास चॉपर, हातोडी अशा वस्तूंचा वापर केस कापण्यासाठी करतो. पुरुषांसोबत महिलाही अलीकडे केस कापण्यासाठी येत असतात.

    अली अब्बासने एका मुलाखतीत सांगितले की, केस कापण्यासाठी तो नेहमी वेगवेगळे प्रकार ट्राय करत असतो. नव्या प्रकाराचं पूर्ण प्रशिक्षण घेतल्यानंतरच तो ते प्रकार लोकांचे केस कापण्यासाठी वापरतो.