पाकिस्तानी जनरल बाजवा अडचणीत; संपत्ती ६ वर्षांत ७६ वरून ४५७ कोटींवर

अमेरिकेत निर्वासित असलेले पाकिस्तानी पत्रकार अहमद नूरानी यांच्या ‘फॅक्ट फोकस’ या संस्थेने कागदोपत्री पुराव्यासह ही माहिती उघड केली आहे. पाकिस्तानच्या अर्थ मंत्रालयाने सोमवारी संध्याकाळी उशिरा या कागदपत्र फुटीच्या चौकशीचे आदेश दिले. बाजवा यांनी पत्नी आयेशा अमजद आणि सून महनूर साबीर यांच्या नावावर सर्वाधिक संपत्ती जमा केली.

    इस्लामाबाद – पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा (Qamar Jawed Bajwa) निवृत्तीच्या (Retirement) ८ दिवसआधी मालमत्तेसंबंधी कागदपत्रे (Property Documents) उघड झाल्याचे गोत्यात आले आहेत. बाजवा यांच्या सहा वर्षांच्या कार्यकाळात त्यांची संपत्ती सहा पटीने वाढवली. त्यांची संपत्ती १३ अब्ज रुपये म्हणजे भारतीय चलनानुसार (Indian Currency) ४५७ कोटी इतकी आहे.

    अमेरिकेत निर्वासित असलेले पाकिस्तानी पत्रकार अहमद नूरानी यांच्या ‘फॅक्ट फोकस’ (Fact Focus) या संस्थेने कागदोपत्री पुराव्यासह ही माहिती उघड केली आहे. पाकिस्तानच्या अर्थ मंत्रालयाने (Pakistan Finance Ministry) सोमवारी संध्याकाळी उशिरा या कागदपत्र फुटीच्या चौकशीचे आदेश दिले. बाजवा यांनी पत्नी आयेशा अमजद आणि सून महनूर साबीर यांच्या नावावर सर्वाधिक संपत्ती जमा केली. बाजवा कुटुंबाने लाहोर, इस्लामाबाद, कराची आणि रावळपिंडी येथे सुमारे २० मोठे भूखंड खरेदी केले. तसेच, अमेरिकेसह इतर देशांतील मालमत्तेत गुंतवणूक केली.

    बाजवा यांनी पत्नी आयेशाच्या नावाने दुबईत मुख्य तेल कंपनी उघडली. आयेशाच्या नावावर अमेरिकेतील एका बँकेत ४१ कोटी रुपये जमा आहेत. ऑक्टोबर २०१८ मध्ये माहनूर साबीरची संपत्ती शून्य होती. २ नोव्हेंबर २०१८ रोजी साबीरची संपत्ती बाजवांचा पुत्र सिद्दीकशी लग्न होताच २४८ कोटी झाली.