चांगलीच झोंबणारी बातमी! पाकिस्तानच्या मुलींना कुठल्या देशातली मुलं आवडतात? अर्ध्या लोकसंख्येला भारतातल्या मुलांचं वेड, कारण…

भारतातल्या सगळ्याच गोष्टी चांगल्या आहेत, असं आश्चर्यकारक उत्तर दिलंय. दुसऱ्या एका मुलीनं उत्तर दिलं की, भारतातले शिख खूप चांगले आहेत. तर काही मुलींनी दिल्ली, मुंबई आणि गोव्यात फिरण्याची आणि चांगलचुंगल भारतीय खाण्याची इच्छा व्यक्त केलीय.

  इस्लामाबाद – पाकिस्तानतल्या तरुणींचा आवडता देश चीन, इराण नाही तर भारत आहे. इतकंच काय पाकिस्तानतल्या मुली भारतीय मुलांसाठी वेड्या आहेत. एका व्हिडीओमध्ये एका महिला रिपोर्टरनं मुलींमा भारताबाबत प्रश्न विचारले तेव्हा पाकिस्तानी मुलींमध्ये भारतीय मुलांबाबत काय भावना आहेत, हे समोर आलंय. एका मुलीला जेव्हा भारत हा आवडीचा देश का आहे अशी विचारणा करण्यात आली, त्यावेळी तिनं भारतातल्या सगळ्याच गोष्टी चांगल्या आहेत, असं आश्चर्यकारक उत्तर दिलंय. दुसऱ्या एका मुलीनं उत्तर दिलं की, भारतातले शिख खूप चांगले आहेत. तर काही मुलींनी दिल्ली, मुंबई आणि गोव्यात फिरण्याची आणि चांगलचुंगल भारतीय खाण्याची इच्छा व्यक्त केलीय.

  एखाद्या भारतीय मुलाचा नंबर द्या

  या व्हिडीओत पाकिस्तानातील एक तरुणी चक्क या रिपोर्टरकडे भारतातल्या एखाद्या मुलाचा नंबर तरी द्या, अशी मागणी करतानाही दिसलीये. पाकिस्तानातल्या बऱ्याच मुलींना भारत देशात प्रवास करण्याची, देश पाहण्याची इच्छा आहे. एका मुलीनं सांगितलंय की, आमच्या मनात भारतीयांबाबत बरचं प्रेम आहे. कधी आम्हाला तिकडं जाण्याची संधी मिळाली किंवा ते जर इथं आले, तर बघा, असं आमंत्रणच तिनं भारतातल्या तरुणाईला दिलंय. हिंदुस्थानाबाबत या मुलींच्या मनाता इतकं प्रेम आहे की, काही मुलींनी चक्क ‘ओम जय जगदीश हरे…’ ही आरतीही गाऊन दाखवली.

  भारतात सासर असण्याची इच्छा

  रिपोर्टरनं एका मुलीला विचारलं की भारतातली मुलं आवडतात की चीनची, त्यावर एका मुलीनं सांगितलं की, चिनी मुलं ही मुर्ख आहेत. चिनी मला अजिबात आवडत नाहीत. भारतातील मुलं मला फारच आवडतात. पाकिस्तानातल्या बऱ्याच मुलींना सीमा ओलांडून भारतात लग्न करण्याची इच्छा आहे. सासर भारतातलं असावं असं त्यांचं म्हणणंय. भारत हा हिसंक देश आहे, असं वाटतं का, या प्रश्नावर असं अजिताबत नाहीये, चांगली -वाईट माणसं सगळ्याच देशात असतात. पाकिस्तानातही त्यांची काही कमी नाहीये, असं एका मुलीनं सांगितलंय.

  पाकिस्तानात महिला असुरक्षित

  एका महिला डॉक्टरनं सांगितलं की, भारत ज्या वेगानं प्रगती करतोय. त्यामुळं आपण अधिक प्रभावित आहोत. पाकिस्तानातील महिलांना भारतातील मुलांचं इतकं वेड का आहे, तर त्यामागचं कारण पाकिस्तानात असलेली असुरक्षितता आहे. पाकिस्तानात महिलांवर अत्याचारांचं प्रमाण जास्त आहे. त्यात अपहरण, बलात्कार यासारख्या घटना तिथं सातत्यानं घडतात. त्यामुळं पाकिस्तानी मुलींना त्यांच्या देशापेक्षा भारत हा अधिक सुरक्षित पर्याय वाटतोय.