मसूद अझहरच्या अटकेसाठी तालिबान सरकारला पाकिस्तानचे पत्र

जैश-ए-मोहम्मदचा संघटनेचा प्रमुख मसूद अझहरला अटक करायचे आहे की, १६ सप्टेंबरला होणाऱ्या उझबेकिस्तानची राजधानी समरकंद येथे होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटना म्हणजेच एसईओ बैठकीपूर्वी पाकिस्तान काही डावपेच आखत आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे.

    इस्लामाबाद : जैश-ए-मोहम्मदचा (Jaish-E-Mohammed) संघटनेचा प्रमुख मसूद अझहरला (Masood Azhar) अटक करण्यासाठी पाकिस्तानने (Pakistan) अफगाणिस्तानला (Afghanistan) पत्र लिहिले आहे. मसूद अझहर हा नांगरहार किंवा कुनार भागात लपून बसल्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याला शोधून अटक करावी, अशी मागणी पाकिस्तानने केली आहे. त्याचबरोबर मसूद अझहरची माहिती द्यावी असेही पाकिस्तानने या पत्रात म्हटले आहे.

    जैश-ए-मोहम्मदचा संघटनेचा प्रमुख मसूद अझहरला अटक करायचे आहे की, १६ सप्टेंबरला होणाऱ्या उझबेकिस्तानची राजधानी समरकंद (Samarkand) येथे होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटना (Shanghai Cooperation Organization) बैठकीपूर्वी पाकिस्तान काही डावपेच आखत आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे. पाकिस्तानने ही भूमिका अशा वेळी घेतली आहे, जेव्हा पॅरिसस्थित आंतरराष्ट्रीय देखरेख संस्था फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सच्या (Financial Action Task Force) ग्रे लिस्टमध्ये मसूद अझहरचा समावेश करण्यात आला आहे. अशा परीस्थितीत पाकिस्तानला दहशतवाद्यांवर कारवाईसारखी पावले उचलणे भाग पडले आहे.

    फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सच्या टीमने अलीकडेच पाकिस्तानला भेट दिली, ज्यामध्ये पाकिस्तानमध्ये दहशतवाद रोखण्यासाठी उचललेली पावले अपुरी असल्याचेही सांगितले. मसूद अझहरच्या अटकेची मागणी करत जगाच्या डोळ्यात धूळ फेक करण्याचा हा पाकिस्तानचा प्रयत्न आहे, अशीही चर्चा सुरू झाली आहे.