सीरिया किनारपट्टीवर प्रवासी बोट बुडाली; ३४ जणांचा मृत्यू

सीरियाच्या वाहतूक मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ही बोट लेबनॉनच्या उत्तर मिन्येह भागातून मंगळवारी रवाना झाली असून त्यात जवळपास दीडशे प्रवासी होते. बहुतेक स्थलांतरित लेबनीज आणि सीरियन होते. तसेच, काहींचे ओळखपत्र न मिळाल्याने त्यांची ओळख पटलेली नाही.

    दमास्कस : सीरियाच्या (Syria) किनारपट्टीवर प्रवास करत असलेली बोट बुडाल्याने (Passenger Boat Sink Off) ३४ स्थलांतरितांचा (Migrant) मृत्यू झाला आहे. बोटीमधील १४ जणांना वाचवण्यात यश आले असून त्यांच्यावर टार्टौस (Tartus) येथील बासेल रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या बोटमध्ये जवळपास १५० लोक असल्याचे सांगण्यात येत आहे.

    सीरियाच्या वाहतूक मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ही बोट लेबनॉनच्या (Lebnon) उत्तर मिन्येह भागातून मंगळवारी रवाना झाली असून त्यात जवळपास दीडशे प्रवासी होते. बहुतेक स्थलांतरित लेबनीज आणि सीरियन होते. तसेच, काहींचे ओळखपत्र न मिळाल्याने त्यांची ओळख पटलेली नाही.

    सहा लाख सीरियन लोकांपैकी १ लाख सिरियन बेकायदेशिरपणे युरोपमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करतात. याच प्रयत्नात एप्रिलमध्ये, लेबनीज नौदलाने पाठलाग केलेली गर्दीने भरलेली स्थलांतरित बोट लेबनॉनच्या त्रिपोलीच्या उत्तरेकडील किनारपट्टीवर बुडाल्याने सहा जणांचा मृत्यू होता. तर सप्टेंबरमध्ये, तुर्कीच्या कोस्टगार्डने दोन बाळांसह सहा स्थलांतरितांचा मृत्यू झाल्याची घोषणा केली आहे.