Passengers had to give the plane a push; Bad condition of airport in Nepal

वाहनात बिघाड झाल्यास ते स्टार्ट व्हावे किंवा अशा ठिकाणी पोहोचवावे जेणेकरून वाहतुकीला अडथळा येणार नाही या उद्देशाने त्याला धक्का देण्यात येतो. पण आता नेपाळमधून एक व्हीडिओ समोर आला असून यात विमानतळावर एका विमानाला लोक धक्का देत असल्याचे दिसून येते. हे विमान तारा एअरलाइन्सचे असून धक्का देण्याची घटना बजूरा येथील कोल्टी विमानतळावर घडली आहे(Passengers had to give the plane a push; Bad condition of airport in Nepal).

    काठमांडू : वाहनात बिघाड झाल्यास ते स्टार्ट व्हावे किंवा अशा ठिकाणी पोहोचवावे जेणेकरून वाहतुकीला अडथळा येणार नाही या उद्देशाने त्याला धक्का देण्यात येतो. पण आता नेपाळमधून एक व्हीडिओ समोर आला असून यात विमानतळावर एका विमानाला लोक धक्का देत असल्याचे दिसून येते. हे विमान तारा एअरलाइन्सचे असून धक्का देण्याची घटना बजूरा येथील कोल्टी विमानतळावर घडली आहे(Passengers had to give the plane a push; Bad condition of airport in Nepal).

    सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर करण्यात येत असलेल्या या व्हीडिओत प्रवासी आणि सुरक्षा कर्मचारी कोल्टी विमानतळाच्या धावपट्टीवर उभ्या असलेल्या विमानाला धक्का देताना दिसून येतात. तारा एअरलाइन्सचे हे विमान टायर फुटल्यावर धावपट्टीवरच उभे राहिल्याने अन्य विमानांच्या उड्डाणात अडथळा निर्माण झाला होता.

    या संकटावर उपाय म्हणून तेथे उपस्थित प्रवासी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना या विमानाला धक्का द्यावा लागला आहे. याप्रकरणी नेपाळच्या नागरी उड्डाण प्राधिकरणाचा दोष अधिक असल्याचे एका युजरने म्हटले आहे. प्राधिकरणाकडे विमानांच्या संचालनासाठी आवश्यक विमानोड्डाण उपकरणे नाहीत. प्राधिकरण एअरलाइन कंपन्यांकडून मोठ्यह प्रमाणात शुल्क आकारते, पण या बदल्यात आवश्यक सुविधा पुरवत नाही. तारा एअरलाइन हिमालयाच्या आव्हानात्मक विमानतळावर विमानसेवा संचालित करत असून बहुतांश नेपाळी लोक याची प्रशंसा करतात असे युजरने म्हटले आहे.