न्यूझीलंडमध्ये पाळीव पोपटांचा हाहाकार, लोकांनी सोडून दिले पक्षी, वाचा काय आहे कारण

    मुंबई : गोड बोलणारे पाळीव पोपट किंवा अनेकांचे लाडके मिठू हे सर्वांनाच फार आवडतात. अनेकजन या गोड पक्षांना आपल्या घरात ठेवतात. परंतू हेच पोपट न्यूझीलंडमध्ये आपत्ती ठरले आहेत. अनेक लोक त्यांना पाळून नंतर काही वेळाने ते उडवून लावत आहेत. न्यूझीलंडमध्ये पोपट किंवा इतर कोणतेही प्राणी-पक्षी पाळण्याची नोंद स्थानिक प्रशासनाला द्यावी लागते. ऑकलंड विद्यापीठाच्या एका संशोधनानुसार, दरवर्षी येथील ९२ टक्के लोक या पोपटांना उडवून देतात. तसेच ते याबाबत माहिती देत ​​नाहीत. अशा परिस्थितीत ऑकलंडच्या आसपासच्या जंगलात आढळणाऱ्या पक्ष्यांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे.

    खरं तर, पाळीव पोपट जंगलात स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे जुळवून घेतात. ते न्यूझीलंडच्या स्थानिक पक्ष्यांवर भारी पडत आहेत. ऑकलंड विद्यापीठाच्या डॉ. मार्गारेट स्टॅनले यांच्या मते, न्यूझीलंडच्या जंगलात इंडियन रेड रिंग आणि अलेक्झांडर पॅराकीट प्रजातीचे पोपट स्थानिक वन्य पक्ष्यांचे अन्न आणि घरटे हिसकावून घेतात.

    न्यूझीलंडच्या जंगलात आढळणारे सुमारे ४० टक्के पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यांच्यावर धोका निर्माण झाला आहे. या समस्येमुळे, 1 सप्टेंबरपासून ऑकलंडमध्ये पाळीव पोपट पाळण्यावर आणि विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. डॉ. स्टॅन्ले यांच्या मते, पाळीव प्राणी जंगलात पोहोचतात तेव्हा ते रोगांचे विषाणूही घेऊन येतात.

    माणसांसोबत राहून, या पोपटांना या रोगांचा प्रतिकार असतो, परंतु ते रानटी पक्ष्यांमध्ये विषाणू पसरवतात. पाळीव पोपट देखील स्थानिक प्रजातीच्या जंगली पोपटांसह प्रजनन करून नवीन अनुवांशिक स्टॉक तयार करत आहेत.

    या पाळीव पोपटांना जंगलातून पकडणे जवळजवळ अशक्य आहे

    डॉ. इमोजेन बॅसेट म्हणतात की पाळीव पोपट एकदा जंगलात पोहोचले की त्यांना पकडणे जवळजवळ अशक्य असते. जेव्हा युरोपीय लोक न्यूझीलंडमध्ये स्थायिक झाले तेव्हा त्यांनी त्यांच्यासोबत उंदीर, मोल आणि ससेही आणले. न्यूझीलंडमध्ये, हे प्राणी नैसर्गिक संतुलन मोठ्या प्रमाणात बिघडवतात. ते कसेबसे आटोक्यात आले, पण पोपटांचा त्रास अवघड आहे.