इंजिनात बिघाड झाल्याने कोलंबियामध्ये विमान कोसळले; आठ जण दगावले

मेडेलिन शहरातील एका निवासी भागातील इमारतीला छोटे विमान धडकले. त्यामुळे इमारतीचा सर्वात वरचा मजला पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. सदर अपघाती विमान ट्विन-इंजिन पाईपर होते. जे मेडेलिन शहरातून चोको येथील पिझारो नगरपालिकेकडे जात होते.

    बोगोटा – कोलंबियातील (Colombia) एका निवासी भागात विमान कोसळले (Flight Accident) आहे. या अपघातात विमानात असलेल्या आठ जणांचा मृत्यू झाला असून मेडेलिन (Medellin) येथे ही घटना घडली. इंजिनमध्ये बिघाड (Engine Failure) झाल्याने हे विमान कोसळले असून ते इमारतीला धडकले.

    मेडेलिन शहरातील एका निवासी भागातील इमारतीला छोटे विमान धडकले. त्यामुळे इमारतीचा सर्वात वरचा मजला पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. सदर अपघाती विमान ट्विन-इंजिन पाईपर होते. जे मेडेलिन शहरातून चोको येथील पिझारो नगरपालिकेकडे (Pizarro Municipal Corporation) जात होते.

    मेडेलिन शहरातील निवासी भागात छोटे विमान इमारतीला धडकल्याने सर्वत्र गोंधळ उडाला. या विमानात वैमानिकासह आठ जण बसलेले होते. या अपघातात विमानातील सर्व लोकांचा मृत्यू झाला. विमानाने ‘ओलाया हेरेरा’ विमानतळावरून उड्डाण केले होते. त्यानंतर काही वेळातच इंजिनमधील बिघाडाची जाणीव पायलटला झाली. त्याने विमानतळ प्राधिकरणाकडे याबाबत माहिती दिली होती. मात्र, तो पायलट या अपघाताला टाळू शकला नाही.