दक्षिण आफ्रिकेत पंतप्रधान मोदींनी ‘असा’ राखला तिरंग्याचा मान, व्हिडिओ व्हायरल

दक्षिण आफ्रिकेतील ब्रिक्स परिषदेदरम्यानचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक व्हिडीओ (PM Narendra Modi Video) समोर आला आहे. प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल अशी कृती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.

    जोहान्सबर्ग : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सध्या दक्षिण आफ्रिका (South Africa) देशाच्या दौऱ्यावर आहेत. दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे ब्रिक्स परिषदेमध्ये (BRICS Summit) ते सहभागी झाले. या परिषदेदरम्यानचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक व्हिडिओ (PM Narendra Modi Video) समोर आला आहे. प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल अशी कृती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा स्टेजवर एकत्र येत होते. स्टेजवर जात असताना भारताचा राष्ट्रीय ध्वज तिरंगा जमिनीवर पडल्याचं पंतप्रधान मोदी यांच्या लक्षात आलं. त्यानंतर मोदींनी थांबून खाली वाकून तिरंगा उचलला आणि तो खिशात ठेवला. दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा यांनीही एक ध्वज उंचावला मात्र तो त्यांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या हवाली केला. सुरक्षारक्षकाने मोदींकडेही तिरंगा देण्याची विनंती केली. मात्र मोदींनी आपला लाडका तिरंगा आपल्या खिशात ठेवून दिला.

    यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ब्राझीलचे राष्ट्रपती लुईझ इनासियो लुला दा सिल्वा, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग, दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा आणि रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांच्यासोबत फोटो काढले. पंतप्रधान मोदींचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय. लोक मोदींच्या कृत्याचं कौतुक करतायत.