Citizens are forcibly confined to a closed iron cage on suspicion of being a Corona patient. Imprisonment in 2 crore civilian homes

कोरोनाच्या सावटामुळे चीनच्या अर्थव्यवस्थेला फटका (economic problem in china)बसण्याची शक्यता आहे. गेल्या १५ दिवसांपासून चीनच्या शेअर बाजारात मोठी घसरण (share market) झाल्याचे समोर आले आहे.

    जगातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था चीनवरदेखील (China) संकट घोंघावू लागले आहे. कोरोनाच्या सावटामुळे चीनच्या अर्थव्यवस्थेला फटका (economic problem in china)बसण्याची शक्यता आहे. गेल्या १५ दिवसांपासून चीनच्या शेअर बाजारात मोठी घसरण (share market) झाल्याचे समोर आले आहे. चीनच्या अर्थव्यवस्थेवरही मंदीचे सावट आहेच पण कोरोनाबाधितांच्या (corona)संख्येतही पुन्हा एकदा वाढ होऊ लागली आहे. कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू (Lockdown In China) होण्याची शक्यता आहे. लॉकडाऊनच्या भीतीने चीनमध्ये शेअर बाजार गडगडला आहे.

    चीन शेअर बाजारातील निर्देशांक Hang Seng China Enterprise Index मध्ये २८ जून पासून घसरण सुरू आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, २८ जूनपासून आतापर्यंत साधारण ९ टक्क्यांनी शेअर बाजार घसरला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या चिंतेमध्ये वाढ झाली आहे. कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढल्यास त्याचा परिणाम अर्थचक्रांवर होणार असल्याची भीती आहे. चीनमध्ये कोरोना संसर्गाबाबत मोठी काळजी घेतली आहे. चीनचे स्टील हब असणाऱ्या एका शहरात फक्त एकच कोरोनाबाधित आढळल्यानंतर या शहरात तीन दिवस लॉकडाऊन लागू केला.

    चीनमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागल्यास पुन्हा लॉकडाऊन लागू होण्याची भीती आहे. मागील आठवड्यात चीनच्या आर्थिक विकासाचा डेटा जाहीर करण्यात आला. यामध्ये दुसऱ्या तिमाहीत चीनच्या आर्थिक विकास वाढीचा दर १.२ टक्के राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.