वेगवान कारची ६ वाहनांना धडक, गर्भवती महिलेसह ५ जणांचा मृत्यू

एका अधिकाऱ्याने सांगितले की, अपघाताची माहिती मिळताच पोलिस, अग्निशमन दलाच्या गाड्या आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. गरोदर महिला, नवजात अर्भकासह ५ जणांचे मृतदेह सापडले. तर ९ जण जखमी झाले आहेत. त्यापैकी ६ मुले होती ज्यांचे वय १ ते १५ वर्षे दरम्यान होते. सर्वांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

    नवी दिल्ली – अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये एक भीषण रस्ता अपघात झाला. यामध्ये ५ जणांचा मृत्यू झाला. तर ९ जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात विंडसर हिल परिसरात झाला आहे. ट्रॅफिक सिग्नल तोडणाऱ्या ६ वाहनांना एका भरधाव कारने धडक दिली. ही घटना गुरुवारी घडली. त्याचा व्हिडिओ शनिवारी समोर आला आहे.

    एका अधिकाऱ्याने सांगितले की, अपघाताची माहिती मिळताच पोलिस, अग्निशमन दलाच्या गाड्या आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. गरोदर महिला, नवजात अर्भकासह ५ जणांचे मृतदेह सापडले. तर ९ जण जखमी झाले आहेत. त्यापैकी ६ मुले होती ज्यांचे वय १ ते १५ वर्षे दरम्यान होते. सर्वांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.भरधाव वेगाने येणाऱ्या कारला ३७ वर्षीय महिला चालवत होती. पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले की, निकोल लिंटन ही व्यवसायाने नर्स आहे. रुग्णालयातून घरी जात असताना ती भरधाव वेगाने कार चालवत होती. या अपघातात त्यांनाही गंभीर दुखापत झाली आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.