पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली बांगलादेशमधील जशोरेश्वरी मंदिराला भेट; मानवजातीला कोरोनापासून मुक्ती द्यावी, यासाठी देवीला साकडे

आज मोदींनी जाशोरेश्वरी मंदिराला भेट दिली. नियोजित दौऱ्यानुसार मोदी सकाळी आकरा वाजतीच्या सुमारास या मंदिरामध्ये पोहचले. मोदींच्या हस्ते देवीची पूजा करण्यात आली. यानंतर एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना मोदींनी आपण देवीकडे संपूर्ण मानवजातीला करोनापासून मुक्ती द्यावी, अशी प्रर्थना केल्याचं म्हणाले.

    बांगलादेश : पंतप्रधान नरेंद्र मोदी २ दिवस बांगलादेश दौऱ्यावर आहेत. काल बांगलादेशच्या सुवर्णमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्यानंतर आज मोदींनी जाशोरेश्वरी मंदिराला भेट दिली. नियोजित दौऱ्यानुसार मोदी सकाळी आकरा वाजतीच्या सुमारास या मंदिरामध्ये पोहचले. मोदींच्या हस्ते देवीची पूजा करण्यात आली. यानंतर एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना मोदींनी आपण देवीकडे संपूर्ण मानवजातीला करोनापासून मुक्ती द्यावी, अशी प्रर्थना केल्याचं म्हणाले.

    दरम्यांन मोदी पुढे बोलतांना म्हमाले की, बांगलादेशमध्ये मी जेव्हा २०१५ मध्ये आलो तेव्हा माँ भाग्यश्वरीच्या चरणांमध्ये लीन होण्याचं भाग्य मला मिळालं होतं. आज मला माँ कालीचा आशिर्वाद घेण्याचं भाग्य मिळालं. माँ कालीचा अशिर्वाद आपल्यावर आहे. आज मानवजात करोनामुळे ज्या संकटांमधून जात आहे. तर माझी देवीकडे हीच प्रार्थना आहे की, संपूर्ण मानवजातील या करोना संकटातून लवकरात लवकर मुक्त करावं. सर्वे भवंतु सुखिनः जे मंत्र आपण जगत आलोय. वसुदैव कुटुंबकम हे आपले संस्कार असल्याने मी संपूर्ण मानवजातीसाठी प्रार्थना करतो, असं एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले.

    यावेळी मोदींनी बांगलादेश सरकारचेही आभार मानले आहेत. म्हणाले की, आज जेव्हा मी या पवित्र ठिकाणी आलो. येथे मला समजलं माँ कालीच्या पुजेची जत्रा असते त्यावेळी मोठ्या संख्येने सीमेच्या पलीकडून (भारतातून)  अनेक भक्त येथे येत असल्याचं समजलं. त्यामुळे इथे अनेक सर्व भक्तांच्या वापरांसाठी एखादा कम्युनिटी हॉल असणं गरजेचं आहे. म्हणूनच भारत सरकार इथे हा हॉल उभारणार आहे. अशी घोषणा मोदींनी केली आहे. तसेचं या कार्यक्रमासाठी आणि प्रकल्पासाठी बांगलादेश सरकारचेही त्यांनी आभार मानले.