अभिमानास्पद! दहिसरची श्रीया परब बनली ‘मिस टुरिझम युनिव्हर्स’!

के. सी. महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण घेतलेल्या श्रीयाला नृत्याची आवड आहे. तिला लहानपणापासून स्टेजचे वेड आहे. स्टेज ही अशी जागा आहे, जिथे मी सर्वात जास्त खूश असते, असे श्रीया सांगते. तिने याआधी 'मिस तियारा'चे विजेतेपद पटकावले आहे. तसेच ती 'मिस अप्सरा महाराष्ट्र'ची अंतिम विजेती ठरली होती.

    सध्या जगभरात भारतीय महिलांचा बोलबाला आहे. त्याचेच एक उदाहरण म्हणजे लेबनान येथे नुकत्याच झालेल्या ‘मिस टुरिझम युनिव्हर्स २०२१’ स्पर्धेत दहिसरच्या श्रीया संजय परब हिने भारताचा झेंडा फडकवला आहे. श्रीयाने ‘मिस टुरिझम युनिव्हर्स आशिया’ या किताबावर नाव कोरले आहे. या स्पर्धेत एकूण २३ देशांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला.त्यातून तिने हे यश संपादन केले आहे. सध्या या यशाबद्दल श्रीयावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

    अशी झाली निवड

    लेबनान येथे मिस टुरिझम युनिव्हर्स २०२१’ स्पर्धा होत्या. त्यातून अंतिम फेरीत पाच कॉन्टिनेंटल क्वीन निवडण्यात आल्या. यामध्ये आशियाची विजेती बनण्याचा बहुमान श्रीयाला मिळाला. स्पर्धेसाठी २ ते १६ सप्टेंबर या काळात श्रीया लेबनान येथे होती. मूळची मालवणची असलेल्या श्रीयाने पहिल्या दिवसापासून वॉक, इंटरह्यू, डाएट याबाबत परिपूर्ण तयारी केली. कोविड काळात देशाबाहेर जाऊन स्पर्धेत उतरण्याची मानसिक तयारी केली, त्याचे यश तिला मिळाले. याचे श्रेय तिने आई-वडील, प्रशिक्षक ऋषिकेश मिराजकर यांना दिले आहे.

    कोण आहे श्रीया
    के. सी. महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण घेतलेल्या श्रीयाला नृत्याची आवड आहे. तिला लहानपणापासून स्टेजचे वेड आहे. स्टेज ही अशी जागा आहे, जिथे मी सर्वात जास्त खूश असते, असे श्रीया सांगते. तिने याआधी ‘मिस तियारा’चे विजेतेपद पटकावले आहे. तसेच ती ‘मिस अप्सरा महाराष्ट्र’ची अंतिम विजेती ठरली होती.