खुनाच्या आरोपीला सार्वजनिकरित्या मृत्युदंड; स्टेडियममध्ये मंत्री आणि लष्करी अधिकारी हजर

खुनाचा आरोप असलेल्या व्यक्तीवर लोकांनी भरलेल्या स्टेडियममध्ये मृताच्या वडिलांनी असॉल्ट रायफलने तीन गोळ्या झाडल्या आणि त्याचा मृत्यू झाला. सार्वजनिकरित्या देण्यात आलेली ही शिक्षा पाहण्यासाठी अनेक तालिबानी नेते उपस्थित होते.

    काबुल – अफगाणिस्तानच्या (Afghanistan) फराह प्रांतात बुधवारी खुनाचा आरोप असलेल्या व्यक्तीला सार्वजनिकरित्या मृत्युदंडाची शिक्षा देण्यात आली आहे. तालिबानच्या (Taliban) प्रवक्त्याने पुष्टी केली की, स्पोर्ट्स स्टेडियमवर (Sports Stadium) हजारोंच्या जमावासमोर हत्येच्या गुन्हेगाराला मारण्यात आले. अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता आल्यानंतर सार्वजनिक मृत्युदंडाची (Pubic Death Penalty) ही पहिलीच घटना आहे.

    बीबीसीच्या रिपोर्टनुसार, खुनाचा आरोप असलेल्या व्यक्तीवर लोकांनी भरलेल्या स्टेडियममध्ये मृताच्या वडिलांनी असॉल्ट रायफलने (Assault Rifle) तीन गोळ्या झाडल्या आणि त्याचा मृत्यू झाला. सार्वजनिकरित्या देण्यात आलेली ही शिक्षा पाहण्यासाठी अनेक तालिबानी नेते उपस्थित होते. सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश, लष्करी अधिकारी आणि अनेक वरिष्ठ मंत्रीही शिक्षा पाहण्यासाठी आले होते, असे तालिबानचे प्रवक्ते जबिहुल्ला मुजाहिद यांनी सांगितले.

    हेरात प्रांतातील व्यक्तीला तालिबानने मृत्युदंडाची शिक्षा सुनावली ती घटना पाच वर्षांपूर्वी घडली होती. यामध्ये तजमीर नावाच्या व्यक्तीने फराह प्रांतातील एका व्यक्तीची हत्या करून त्याची मोटारसायकल आणि फोन चोरला होता. मृताच्या कुटुंबीयांनी आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली, त्यानंतर त्याला तालिबानने अटक केली.