blue moon

सर्वसामान्य लोकांनाही चंद्रावर फिरायला जाता यावं यासाठी नासानंही पुढाकार घेतला आहे. त्यासाठीचं तंत्रज्ञान तयार करण्यासाठी विविध कंपन्यांना त्यांनी प्रोत्साहन द्यायला सुरुवात केली आहे. एवढंच नव्हे, त्यासाठी नासानं पाच कंपन्यांबरोबर करार केला असून एलन मस्क आणि जेफ बेझोस यांच्या कंपन्यांचाही त्यात समावेश आहे.

    कोणाला जर पर्यटनासाठी चंद्रावर जायचे असेल तर तयारीला लागा कारण आता ती संधी उपलब्ध झाली आहे. जगभरातील पर्यटन अनेक दिवस बंद असताना, आता पर्यटनासाठी इतकी दारं खुली होऊ लागली आहेत की, लोकं अंतराळातही सैर करायला लागले आहेत.आगामी तीन-चार वर्षांतच सर्वसामान्य पर्यटक आता चंद्रावरही जाऊ शकतील आणि इतकेच नाहीतर तेथे ‘घर’ करून राहतीलही!

    ‘स्पेस एक्स’ या कंपनीचे संस्थापक एलन मस्क आणि ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांच्या ‘ब्लू ओरिजिन’ या कंपन्यांनी काही नागरिकांना नुकतीच अंतराळ सफर केली. आजपर्यंत काही संशोधक चंद्रावर जाऊन आले आहेत, पण आजवर एकही सर्वसामान्य माणूस चंद्रावर जाऊन आलेला नाही. मात्र त्यांना चंद्रावर घेऊन जाण्याची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे.

    सर्वसामान्य लोकांनाही चंद्रावर फिरायला जाता यावं यासाठी नासानंही पुढाकार घेतला आहे. त्यासाठीचं तंत्रज्ञान तयार करण्यासाठी विविध कंपन्यांना त्यांनी प्रोत्साहन द्यायला सुरुवात केली आहे. एवढंच नव्हे, त्यासाठी नासानं पाच कंपन्यांबरोबर करार केला असून एलन मस्क आणि जेफ बेझोस यांच्या कंपन्यांचाही त्यात समावेश आहे. चंद्रावर घरं बांधायचे आणि नवे रोवर तयार करणं आणि चंद्रावर नवी पॉवर सिस्टीम विकसित करण्याचाही प्रयत्न या मोहिमेतून केला जाणार आहे. एका कॅप्सूलमधून एकावेळी चार जणांना चंद्रावर पाठविण्याची योजना असून त्यासाठी वीस कोटी ३२ लाख डॉलर्स खर्च येण्याची शक्यता आहे, असं नासाच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

    ‘मूनवॉक’चाही समावेश!

    चंद्र पर्यटनात ‘मूनवॉक’साठीची व्यवस्थाही त्यात करण्यात येणार आहे. जे पहिले चार जण चंद्रावर जातील, त्यातील दोघांना चंद्रावर उतरून ‘मूनवॉक’ करण्याची संधी मिळेल. एक आठवड्यानंतर ते परत पृथ्वीवर येतील.