
आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या श्रीलंकेमध्ये (Sri Lanka Crisis) मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू आहे. सरकारविरोधात मोठ्या प्रमाणात असंतोष पसरला असून त्याच पार्श्वभूमीवर महिंदा राजपक्षे (Mahinda Rajpakshe) यांनी आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला. आता ही जबाबदारी रानिल विक्रमसिंघे (Ranil Wickremesinghe) यांच्याकडे आली आहे.
कोलंबो: श्रीलंकेतून (Sri Lanka News) एक मोठी बातमी समोर आली आहे. युनायटेड नॅशनल पार्टीचे (United National Party) नेते रानिल विक्रमसिंघे (Ranil Wickremesinghe) यांच्याकडे श्रीलंकेच्या पंतप्रधान पदाचा कार्यभार सोपवण्यात येणार आहे. श्रीलंकेच्या २२५ सदस्यांच्या संसदेत रानिल विक्रमसिंघे यांच्याकडे केवळ एकच जागा आहे, तरीही ते नवे पंतप्रधान असतील.
आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या श्रीलंकेमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला आता हिंसक वळण लागलं आहे. सरकारविरोधात मोठ्या प्रमाणात असंतोष पसरला असून त्याच पार्श्वभूमीवर महिंदा राजपक्षे यांनी आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला. आता ही जबाबदारी रानिल विक्रमसिंघे यांच्याकडे आली आहे.
Ranil Wickremesinghe appointed as Sri Lanka’s new prime minister
— Press Trust of India (@PTI_News) May 12, 2022
रानिल विक्रमसिंघे यांनी याआधी ४ वेळा श्रीलंकेचे पंतप्रधान पद भूषवले आहे. ऑक्टोबर २०१८ साली तत्कालीन राष्ट्रपती मैत्रीपाला सिरीसेना यांनी त्यांना पदावरुन हटवलं होतं. आता देश आर्थिक संकटात असताना ही जबाबदारी पुन्हा एकदा त्यांच्याकडे आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सत्ताधारी श्रीलंका पोदुजाना पेरामुना, विरोधी पक्ष जन बालावेगाया आणि इतर लहान पक्षांनी रानिल विक्रमसिंघे यांना पाठिंबा दिला आहे.