vijay diwas

भारताने १६ डिसेंबर १९७१ या दिवशी पाकिस्तानचा युद्धात(India-Pakistan war) पराभव केला होता. हे युद्ध सलग १३ दिवस सुरु होते. 

भारतभर १६ डिसेंबर(16 December) हा दिवस ‘विजय दिवस’(vijay diwas) म्हणून साजरा केला जातो. मात्र अनेकांना हा विजय दिवस का साजरा केला जातो ? हे च माहिती नाही. याच दिवसाचे महत्व आज आपण जाणून घेणार आहोत.

भारताने १६ डिसेंबर १९७१ या दिवशी पाकिस्तानचा युद्धात पराभव केला होता. हे युद्ध सलग १३ दिवस सुरु होते.  पाकिस्तानी आर्मीचे जनरल ए.के. नियाजी हे ९० हजारपेक्षा जास्त सैन्यबळ घेऊन भारतावर चाल करुन आले होते. पाकिस्तानच्या आक्रमणामुळेच १९७१ च्या युद्धाला तोंड फुटले. पुर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान याच्यात  फुट पडली होती. भारताने पुर्व पाकिस्तान म्हणजेच सध्याचा बांग्लादेश यास आपला पाठींबा दर्शवला.  बांगलादेश स्वतंत्र झाला. हीच बाब पाकिस्तानला पटली नाही आणि पाकिस्तान आर्मीने भारतावर चालून येण्याचा पवित्रा घेतला.  मात्र या युद्धात पाकिस्तानला हार मानावी लागली. जवळपास १३ दिवसांच्या युद्धानंतर १६ डिसेंबर १९७१ रोजी बांगलादेशातील ढाका येथे पाकिस्तानी सैन्याने भारतीय आणि बांगलादेशी सैन्यासमोर शरणागती पत्करली. या युद्धात भारताचे ३९०० वीर धारातीर्थी पडले, तर ९८५१ वीर जखमी देखील झाले.

भारतीय सैन्याने पाकिस्तानी सैन्यावर मिळवलेल्या या अभुतपूर्व विजयामुळे १६ डिसेंबर हा दिवस देशभर विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी युद्धात शहिद झालेल्या वीर जवानांना श्रद्धांजली वाहिली जाते.