१०० दिवसांनंतरही इराणमध्ये दडपशाही; हिजाबविरोधी आंदोलनाचे धागेदोरे ब्रिटनपर्यंत, सर्वात दीर्घकाळ चाललेले आंदोलन

इराण सरकारने सांगितले की, नुकतेच आंदोलनाचे नेतृत्व केल्याच्या कारणावरून ७ जणांना अटक केली आहे. हे लोक इराणमधून पळून जाण्याच्या प्रयत्नात होते. त्यामुळे सिद्ध होते की, विध्वंसक कारवायांचे धागेदोरे ब्रिटनचेशी जोडले आहेत.

    तेहरान : इराणमध्ये सरकारकडून (Iran Government) हिजाबविरोधी आंदोलकांवर (Hijab Against Agitation) १०० दिवसांनंतरही दडपशाही सुरू आहे. विरोध रोखण्यासाठी अगदी मृत्यूपर्यंत शिक्षा देण्यात येत आहेत. इराण सरकारने सांगितले की, नुकतेच आंदोलनाचे नेतृत्व केल्याच्या कारणावरून ७ जणांना अटक केली आहे. हे लोक इराणमधून पळून जाण्याच्या प्रयत्नात होते. त्यामुळे सिद्ध होते की, विध्वंसक कारवायांचे धागेदोरे ब्रिटनचेशी (Britain) जोडले आहेत.

    आंदोलनाच्या दडपशाहीमुळे जर्मनीने (Germany) इराणसोबतच्या व्यावसायिक योजना लांबणीवर टाकल्या आहेत. ब्लूमबर्गच्या (Bloomberg) वृत्तानुसार, इराणमधील स्थिती खूप गंभीर झाली आहे. याआधी युरोपीय संघटनेने सांगितले की, इराणसोबतचे संबंध बिघडत आहेत. हे २०१६ मधील इराणसोबतच्या अणु करारानंतर सुरू झालेले कर्ज आणि गुंतवणूक हमीवर परिणाम करते. याच कारणामुळे त्यांची जानेवारीपासून गुंतवणूक हमी बंद केली जाईल. युरोपीय संघात जर्मनी, इराणचा आघाडीचा व्यावसायिक भागीदार आहे. दोन्ही देशांत २०२१ मध्ये सुमारे १.९ अब्ज डॉलर (१६ हजार कोटी रु.) आणि या वर्षाच्या नऊ महिन्यांत १.६ अब्ज डॉलरचा (१४ हजार कोटी रु.) व्यवसाय झाला आहे.

    देशात १९७९ च्या इस्लामिक क्रांतीनंतर सर्वात दीर्घकाळ चाललेले हे आंदोलन ठरले. याआधी मागील ५ वर्षांत दोन वेळा आणि आंदोलन झाले आहे. मात्र, ती दाबण्यात आली. २०१७ च्या अखेरीस सुरू झालेले आंदोलन २०१८ च्या सुरुवातीपर्यंत चालले होते. नोव्हेंबर २०१९ मध्ये महिलांनी स्वातंत्र्य, आयुष्य आपल्या मर्जीने जगू देण्याच्या मागणीवरून देशभर आंदोलन केले होते. आंदोलनात काही सेलिब्रिटीजनेही उघड समर्थन दिले आहे.

    शिक्षा, धरपकडीनंतरही आंदोलक मागे हटण्यास तयार नाहीत. जीव गेला तरी चालेल, आम्ही विरोध करत राह, असे त्यांचे म्हणणे आहे. स्थिती आणखी बिकट होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. इराणमध्ये हिजाबविरोधी आंदोलनामुळे १६ सप्टेंबरला २२ वर्षीय युवती महसा अमिनीला ताब्यात घेऊन तिचा छळ करण्यात आला होता. यानंतर तिचा मृत्यू झाला व देशभर आंदोलनाला सुरुवात झाली. तेव्हापासून ६९ मुलांसह ५०० मारले गेले.