drowning sex doll

तानाका नात्सुकी (Tanaka Natsuki) ही जपानी युट्युबर हाचिनोहे (Hachinohe) इथल्या किनाऱ्यावर फिशिंग व्हिडीओ शूट करत होती. त्यावेळी तिला एक महिला (Drowning Woman) पाण्यात बुडताना दिसली.

    कधीकधी आपण अपेक्षा एका गोष्टीची करतो आणि सापडतं काहीतरी भलतचं. जपानमध्ये अशीच एक घटना घडली आहे. महिला बुडताना दिसत आहे असे पाहून रेस्क्यु टीम मदतीला धावली मात्र त्यावेळी जे सत्य बाहेर आलं ते पाहून सगळ्यांनाच धक्का बसला.

    तानाका नात्सुकी (Tanaka Natsuki) ही जपानी युट्युबर हाचिनोहे (Hachinohe) इथल्या किनाऱ्यावर फिशिंग व्हिडीओ शूट करत होती. त्यावेळी तिला एक महिला (Drowning Woman) पाण्यात बुडताना दिसली. इतक्यात कुणीतरी रेस्क्यु टीमला फोन केल्यामुळे पोलीस, अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि पॅरामेडिक्सचे कर्मचारी त्या ठिकाणी दाखल झाले. त्यांनी तातडीने रेस्क्यु ऑपरेशन करून त्या पाण्यात बुडणाऱ्या महिलेला पाण्यातून बाहेर काढलं. तेव्हा त्यांना एक अजबच गोष्ट लक्षात आली, की ती महिला नव्हती तर ती रबरी सेक्स डॉल ( Sex Doll) होती. त्यामुळे सगळेच आश्चर्यचकीत झाले. रबरी सेक्स डॉलला ‘डच वाईफ’ (Dutch Wife) म्हणतात. काही पाश्चिमात्य देशांत आपली कामवासना भागवण्यासाठी सेक्स डॉलचा वापर केला जातो.

    आपला हा अनुभव तानाका नात्सुकीने आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. तिनी लिहिलंय, ‘मी जेव्हा माझा फिशिंग व्हिडीओ शूट करत होते तेव्हा मला पाण्यात एक मृतदेह तरंगत आला आहे असं वाटलं, पण ती एक डच वाईफ निघाली. मला असं वाटतं की कुणाचातरी गैरसमज झाला आणि त्याने सरकारी अधिकाऱ्यांना फोन केला. त्यामुळे पोलीस (Police) आणि रुग्णवाहिका (Ambulance) तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तिला वाचवलं हे बरं झालं.’ सेक्स डॉलच्या रेस्क्युचा हा व्हिडिओ इंटरनेटवर शेअर झाल्यानंतर प्रचंड व्हायरल झाला. त्यावर अनेक प्रतिक्रियाही व्यक्त झाल्या.


    जपानमधली सरकारी यंत्रणा इतकी जबरदस्त आहे की कुणाचाही फोन आल्यावर तातडीने मदतीसाठी दाखल होते. या घटनेमध्ये सेक्स डॉल निघाली ही गोष्ट ठीक आहे पण एका माणसाचा जीव वाचवण्यासाठी संपूर्ण यंत्रणा काही क्षणांत तिथं दाखल होते हेही महत्त्वाचं आहे. जगभरातील लोक हा व्हिडीओ पाहून आश्चर्य व्यक्त करत आहेत.