Rich woman pays Rs 11 lakh a month to boyfriend 15 years younger than her to do housework

टीकटॉकवर(TikTok) सध्या ज्युली नावाच्या ४५ वर्षीय महिलेच्या प्रेमकहाणीची चर्चा रंगली आहे. @julie.withthebooty या नावाने ज्युलीचे अकाऊंट आहे. ज्युलीने तिच्या ३० वर्षीय बॉयफ्रेंडला तिच्याच घरी घरगडी म्हणून कामाला ठेवले आहे. त्यासाठी ती त्याला अकरा लाख रुपये पगार देखील देते( Rich woman pays Rs 11 lakh a month to boyfriend 15 years younger than her to do housework ).

    ‘मी महिन्याला माझ्या बॉयफ्रेंडवर जवळपास पंधरा लाख खर्च करते. त्याच्यात अकरा लाख त्याचा पगारच आहे. ज्यात तो माझ्या घरातील सर्व कामे करतो. घरातील साफ सफाई, जेवण बनवणे, लादी पुसणे, भांडी घासणे असे सर्वच करतो. त्यासाठी मी त्याला बराच मोठा पगार देते. यामुळे माझा बॉयफ्रेंड पूर्णवेळ माझ्यासोबत राहतो व घरातील कामही होते. पण इतका पगार देऊनही तो अनेकदा घरातली कामं विसरतो. गेल्या आठवड्यात त्याने पूल साफ केला नाही, असे ज्युली सांगते. द सन युकेने ही बातमी दिली होती.

    सदर महिलेला तिच्या व तिच्या बॉयफ्रेंडमधील वयाच्या फरकामुळे अनेकदा ट्रोल केले जाते. वयातील अंतर बघून अनेकदा मला ट्रोल केले जाते. तू म्हातारी झालीस की तुझा बॉयफ्रेंड तुम्हाला सोडून जाणार. तो दुसऱ्या मुलीच्या प्रेमात पडेल. तरुण मुलगी पटवेल. असे सतत ऐकवले जाते. पण मी त्याकडे दुर्लक्ष करते, असेही ज्युली सांगते.