Ronaldo also 'champion' on Instagram; The only player with 300 million followers

रिपोर्टनुसार, ही कार सोमवारी सकाळी स्पॅनिश शहरातील माजोर्का येथील एका घराच्या एंट्री गेटसमोर अपघाताची शिकार झाली. रोनाल्डोच्या एका कर्मचाऱ्याने गाडी चालवली होती, त्याचे नियंत्रण सुटले. मात्र, कर्मचाऱ्यांचे कोणतेही नुकसान झालेले नाही.

    नवी दिल्ली – पोर्तुगालचा स्टार स्ट्रायकर ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या (Ronaldo ) बुगाटी व्हेरॉन कारला ( car crash) अपघात झाला आहे. रिपोर्टनुसार, ही कार सोमवारी सकाळी स्पॅनिश शहरातील माजोर्का येथील एका घराच्या एंट्री गेटसमोर अपघाताची शिकार झाली. रोनाल्डोच्या (footballer)  एका कर्मचाऱ्याने गाडी चालवली होती, त्याचे नियंत्रण सुटले. मात्र, कर्मचाऱ्यांचे कोणतेही नुकसान झालेले नाही.

    कारची किंमत १७ कोटी आहे. घटनास्थळी स्थानिक पोलिस आणि सिव्हिल गार्डचे अधिकारीही उपस्थित होते. वाहनाच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. जगातील सर्वात श्रीमंत खेळाडूंपैकी एक असलेल्या रोनाल्डोकडे अनेक आलिशान कार आहेत.

    रोनाल्डोकडे बुगाटीची आणखी एक कार आहे. जगातील फक्त काही लोकांकडे त्याची आवृत्ती आहे. कारची किंमत ८१ कोटींहून अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे. रोनाल्डोने २०२० मध्ये ही कार खरेदी केली होती. या कारचा कमाल वेग २३६ किमी प्रतितास आहे, तर ती २.४ सेकंदात ० ते ६२ किमी प्रतितास वेग पकडू शकते.