रुचिरा कंबोज संयुक्त राष्ट्रातील भारताच्या पहिल्या महिला दूत

रुचिरा कंबोज या भारतीय परराष्ट्र सेवेच्या १९८७ च्या बॅचच्या अधिकारी आहेत. त्या १९८७च्या सिव्हिल सर्व्हिसेस बॅचच्या टॉपरदेखील आहेत. रुचिरा या भूतानमधील भारताच्या पहिल्या महिला राजदूत होत्या. त्यांनी त्यांच्या करियरची सुरुवात फ्रान्समध्ये तिसरे सचिव म्हणून केली होती. रुचिरा कंबोज या संयुक्त राष्ट्रात भारताच्या पहिल्या महिला राजदूत बनल्या आहेत.

    नवी दिल्ली : रुचिरा कंबोज (Ruchira Kamboj) या संयुक्त राष्ट्रात (United Nations) भारताच्या पहिल्या महिला राजदूत (Woman Ambassador) बनल्या आहेत. त्या टी.एस. तिरुमूर्ती (T.S.Tirumurti) यांची जागा घेतील. रुचिरा या न्यूयॉर्कमधील संयुक्त मुख्यालयाच्या पहिल्या स्थायी महिला राजदूत बनल्या आहेत.

    रुचिरा कंबोज या भारतीय परराष्ट्र सेवेच्या (Indian Foreign Service) १९८७ च्या बॅचच्या अधिकारी आहेत. त्या १९८७च्या सिव्हिल सर्व्हिसेस बॅचच्या टॉपरदेखील आहेत. रुचिरा या भूतानमधील भारताच्या पहिल्या महिला राजदूत होत्या. त्यांनी त्यांच्या करियरची सुरुवात फ्रान्समध्ये तिसरे सचिव म्हणून केली होती. फ्रान्समधील भारतीय दूतावासात त्यांनी द्वितीय सचिवपदही भूषवले आहे.