युक्रेनच्या स्वातंत्र्यदिनावर रशियाचे विरजण; मिसाईल हल्ल्यात २२ नागरिकांचा मृत्यू

युक्रेनमधील स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमही रद्द करण्यात आले होते. त्यानंतर स्वातंत्र्यदिनी रशियाने रेल्वे स्थानकावर हल्ला केला. यामध्ये २२ जण जणांचा मृत्यू झाला. ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त युक्रेनचा दौरा केला. बोरिस जॉन्सन यांनी कीव्हला भेट दिली आहे. युद्ध सुरू झाल्यापासून जॉन्सन यांचा तिसरा युक्रेन दौरा आहे.

    मॉस्को : युक्रेनने २४ ऑगस्ट रोजी ३१ वा स्वातंत्र्यदिन (Ukraine’s Independence Day) साजरा केला. मात्र, या आनंदावर रशियाने क्षेपणास्त्र हल्ला (Russia Missile Attack) करत विरजण घातले. रशियन क्षेपणास्त्र हल्ल्यात २२ नागरिक ठार झाले आणि पूर्व युक्रेनमध्ये एका प्रवासी ट्रेनला (Train Fired) आग लागली, असे कीव्हमधील (Kyiv) अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या हल्ल्याच्या आदल्या दिवशी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की (Vladimir Zelensky) यांनी रशियाकडून हल्ल्याची शक्यता व्यक्त केली होती.

    युक्रेनमधील स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमही रद्द करण्यात आले होते. त्यानंतर स्वातंत्र्यदिनी रशियाने रेल्वे स्थानकावर हल्ला केला. यामध्ये २२ जण जणांचा मृत्यू झाला. ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त युक्रेनचा दौरा केला. बोरिस जॉन्सन यांनी कीव्हला भेट दिली आहे. युद्ध सुरू झाल्यापासून जॉन्सन यांचा तिसरा युक्रेन दौरा आहे.

    युक्रेनच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त अनेक देशांनी शुभेच्छा दिल्या. तसेच, युरोपीय देशांच्या नेत्यांनी युक्रेनच्या नागरिकांच्या त्याग आणि धैर्याला सलाम करत शस्त्रास्त्रांचा पुरवठा सुरू ठेवण्याचा संकल्प व्यक्त केला; तसेच, युक्रेनवरील हल्ल्याबद्दल रशियाचा निषेध केला. अमेरिकेने येत्या काही वर्षात युक्रेनला लष्करी लढाईला मदत करण्यासाठी सुमारे तीन अब्ज डॉलरचे मोठे लष्करी मदत पॅकेज जाहीर केले आहे.