युक्रेनवर हल्ल्याचं सावट ! दोन लाख सैनिकांसह रशिया पुन्हा कीववर हल्ला करण्याच्या तयारीत

युक्रेनियन लष्कराचे कमांडर-इन-चीफ झालुज्नी यांनी भीती व्यक्त केली आहे की नवीन वर्ष 2023 च्या सुरुवातीच्या महिन्यांत रशिया कीववर नवीन हल्ला करू शकतो.

    गेल्या 10 महिन्यांपासून सुरू असलेले रशिया-युक्रेन (Ukrain Russia war) युद्ध थांबण्याऐवजी आणखी चिघळण्याची शक्यता आहे. कारण रशिया युक्रेनची राजधानी कीववर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. हा हल्ला रशिया  दोन लाख नवीन सैनिकांची तुकडीही तयार करत आहे. युक्रेनच्या लष्करप्रमुखांनी असा दावा केल्याच सांगण्यात येत आहे. 

    युरोपियन युनियनकडून रशियावर नवे निर्बंध

    दुसरीकडे, युरोपियन युनियनने (EU) गुरुवारी रशियावर नवीन निर्बंध लादण्यात आले आहे. युक्रेनमधील युद्धावर रशियावर दबाव वाढवण्यासाठी युरोपियन युनियनने गुरुवारी नवीन निर्बंध जाहीर केले. यासोबतच युरोपियन युनियननेही युक्रेनला मदत देण्याची घोषणा केली. EU ने 27 देशांच्या राजदूतांशी अनेक दिवस सल्लामसलत केल्यानंतर नवीन निर्बंध मंजूर केले. नवीन निर्बंधांमध्ये सुमारे 200 रशियन लोकांना काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. रशियाच्या खाणकामावरील निर्बंधांबरोबरच तेल निर्यातीवरही किंमत मर्यादा घालण्यात आली आहे. युक्रेनला 18 अब्ज युरो आर्थिक मदत याशिवाय युरोपियन युनियनने युक्रेनला 18 अब्ज युरोची मदत जाहीर केली आहे. युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी ब्रुसेल्स येथे झालेल्या बैठकीत 27 EU सदस्य देशांच्या नेत्यांना ऊर्जा उपकरणे आणि हवाई संरक्षण प्रणाली वितरित करण्यास सांगितले.

    नवीन वर्षात कीववर हल्ला होण्याची भीती

    युक्रेनियन लष्कराचे कमांडर-इन-चीफ झालुज्नी यांनी भीती व्यक्त केली आहे की नवीन वर्ष 2023 च्या सुरुवातीच्या महिन्यांत रशिया कीववर नवीन हल्ला करू शकतो. रशिया यासाठी सुमारे 200,000 नवीन सैनिकांना तयार करत आहे. तो पुन्हा एकदा कीववर कूच करेल यात शंका नाही. द इकॉनॉमिस्टशी झालेल्या चर्चेत युक्रेनच्या जनरलने सांगितले की, हे पाहता आपल्याला तयारी करावी लागेल. पुढील काही महिन्यांसाठी राखीव सैनिक आणि लष्करी साहित्याचा साठा तयार ठेवावा लागणार आहे. या वर्षी 24 फेब्रुवारीला रशियाने युक्रेनवर हल्ला केला होता.