
रशियाकडून कधीही अणुहल्ला होईल या भीतीच्या सावटाखाली जगण्यापेक्षा युक्रेनच्या नागरिकांनी तणावाखाली न राहता से-क्स पार्टीचं आयोजन केलं आहे. किव्ह येथील एका टेकडीवर ही पार्टी होणार आहे.
रशिया आणि युक्रेनच्या युद्धाचं (Russia Ukraine War) आणखी एक पर्व सुरू झालं आहे. काही दिवसांपूर्वी रशियाने युक्रेनवर क्षेपणास्त्र हल्ले (Missile Attacks) केले आहेत. रशिया (Russia) सातत्याने युक्रेनला (Ukraine) धमकावत असल्याने आता अणुहल्ल्याचा धोकाही भेडसावू लागला आहे. पण, युक्रेनच्या काही नागरिकांनी या दरम्यान से-क्स पार्टी (S-E-X Party) करण्याचं आयोजन केलं आहे.
रशियाकडून कधीही अणुहल्ला होईल या भीतीच्या सावटाखाली जगण्यापेक्षा युक्रेनच्या नागरिकांनी तणावाखाली न राहता से-क्स पार्टीचं आयोजन केलं आहे. किव्ह येथील एका टेकडीवर ही पार्टी होणार आहे. टेलिग्राम (Telegram) या सोशल मेसेजिंग साईटवर (Social Messaging Site) या पार्टीसाठी आधीच १५ हजारांहून अधिक नागरिकांनी नोंदणी (Registered) केली आहे. तिथे सहभागी होणाऱ्यांच्या हातांवर रंगीत पट्ट्या बांधण्यात येणार आहेत. पट्ट्यांची संख्या आणि त्यांचा रंग यांवरून त्यांची आवड-निवड ठरणार आहे. हा पार्टीसाठीचा निकष असणार आहे.
स्थानिक नागरिक से-क्स पार्टीसाठी त्यांचे नुक्लिअर शेल्टर्स आणि बंकर्स सोडणार आहेत. युक्रेनच्या नागरिकांनी भीतीच्या सावटाखाली जगण्याऐवजी असा मार्ग स्वीकारत आहेत. या से-क्स पार्टीच्या माध्यमातून युक्रेनियन नागरिक रशियाला हा संदेश देऊ इच्छितात की, आम्हाला रशियाची भीती वाटत नाही.
युक्रेनमध्ये रशियाच्या अणुहल्ल्यामुळे प्रचंड भीतीचं वातावरण आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी हल्ल्याच्या भीतीपोटी पोटॅशियम आयोडाईडच्या गोळ्या वाटायला सुरुवात केली आहे. या गोळ्या अणुहल्ल्यापूर्वी किंवा नंतर लगेचच घेतल्यास थायरॉईड ग्रंथींमध्ये होणारा किरणोत्सर्गाचा परिणाम टाळता येतो. तसंच, अणुहल्ल्याला प्रतिबंध करणारी शेल्टर्स आणि केंद्र स्थापन करण्यात आली आहेत.