रशियन सैनिकांच्या मातांशी पुतीन यांनी साधला संवाद, निवासस्थानी घेतली बैठक

आपल्या मुलगा गमावल्याचे दु:ख विशेषतः आईसाठी सर्वात कठीण असते. मी तुचम्या वेदना समजतो. पण तुमच्या मुलांनी दिलेले योगदान देशासाठी विसरता येणार नाही. पण मी तुम्हा मातांचा कायम ऋणी आहे.

    नवी दिल्ली – रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनविरुद्ध युद्ध लढणाऱ्या सैनिकांच्या मातांची भेट घेतली. त्या सर्व महिलांचे दु:ख शेअर केले, मुलगा गमावण्याच्या दु:खापेक्षा काहीही मोठे नाही, असे पुतीन यांनी त्या मातांशी संवाद साधताना म्हटले. पुतीन यांनी मॉस्को येथील त्यांच्या घरी झालेल्या बैठकीत शहीद जवानांच्या आईंशी संवाद साधला.

    ते बैठकीत बोलताना म्हणाले की, आपल्या मुलगा गमावल्याचे दु:ख विशेषतः आईसाठी सर्वात कठीण असते. मी तुचम्या वेदना समजतो. पण तुमच्या मुलांनी दिलेले योगदान देशासाठी विसरता येणार नाही. पण मी तुम्हा मातांचा कायम ऋणी आहे. दरम्यान, अनेक महिलांनी आपल्या मुलांना योग्य प्रशिक्षण आणि शस्त्र न देताच युद्धात पाठविले जात असल्याचा आरोप केला आहे. अशा काळातच पुतीन यांनी शहीद जवानांच्या मातांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. एकीकडे आरोप सुरू असताना पुतीन यांनी घेतलेल्या या बैठकीची मात्र चर्चा होवू लागली आहे.