लाखो डॉलर्स घेऊन पळून जाताना युक्रेनच्या माजी खासदाराची पत्नीला हंगेरियन सीमेवर सैनिकांनी पकडलं

रशिया - युक्रेन युध्दाचा सर्वाधीक फटका युक्रेनियन नागरिकांना झाला आहे. आपलं सर्वस्व सोडून त्यांना देश सोडून जावं लागतं आहे. सुमारे तीन लाख लोकांनी युक्रेनमधून पलायन केलं आहे.

    रशिया – युक्रेन युध्दाचा (Russia Ukraine War) आज 28 दिवस आहे. गेल्या अनेक दिवसापासून युक्रेन- रशिया मध्यो सुरू असलेल्या संघर्षामुळे युक्रेनच्या अनेक नागरिकांना आपला देश सोडून जावं लागत आहे. अशावेशी बेकायदा संंपत्ती घेऊन जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका महिलेला हंगेरीच्या सीमेवर पकडण्यात आल्याची माहिती आहे.  कोटवित्स्की असं तीचं नाव असून ती युक्रेनच्या माजी खासदाराची पत्नी काही दिवसांपूर्वी एका सुटकेसमध्ये डॉलर आणि युरो घेऊन जात होती. युक्रेनच्या माजी खासदाराच्या पत्नी आहे.

    मीडिया रिपोर्ट्सनुसार, युक्रेनच्या माजी खासदाराची पत्नी काही दिवसांपूर्वी एका सुटकेसमध्ये डॉलर आणि युरो घेऊन जात होती. कोटवित्स्की पैसे घेऊन देश सोडण्याचा प्रयत्न करत होती, मात्र हंगेरीच्या सीमेवरील सुरक्षा जवानांनी तिला अडवले. सैनिकांनी संशयावरून तिच्या सुटकेसची झडती घेतली तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. सूटकेसमध्ये सुमारे 28 दशलक्ष डॉलर्स आणि 1.3 दशलक्ष युरो रोख होते. ती झाकरपट्टिया प्रांतातून हंगेरीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगण्यात येत आहे.

    युद्धामुळे लाखो लोकांना सोडावा लागला देश

    रशिया – युक्रेन युध्दाचा सर्वाधीक फटका युक्रेनियन नागरिकांना झाला आहे. आपलं सर्वस्व सोडून त्यांना देश सोडून जावं लागतं आहे. सुमारे तीन लाख लोकांनी युक्रेनमधून पलायन केलं आहे. नागरिक जीव वाचवण्यासाठी सर्वकाही सोडून जायला तयार झाले आहेत. तर अशाचप्रकारे कोटवित्स्कीला कोट्यवधी रुपये घेऊन देश सोडून पळून जात असताना पकडण्यात आले.