pilot sumit malavade

युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण (Medical Students In Russia) घेण्यासाठी गेलेते असंख्य भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकून पडले. त्यांना भारतात परत आणण्याचे आव्हान भारत सरकारसमोर होते. त्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. भारताच्या काही जिगरबाज वैमानिकांनी हे आव्हान स्विकारले. या वैमानिकांमध्ये (Pilot From Mahad) एक महाडकर (Mahad) होता.

    रोहन शिंदे, महाड : रशियाने युक्रेनवर हल्ला (Russia Ukraine War) केला आणि भारतात एकच गोंधळ निर्माण झाला. युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण (Medical Students In Russia) घेण्यासाठी गेलेते असंख्य भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकून पडले. त्यांना भारतात परत आणण्याचे आव्हान भारत सरकारसमोर होते. त्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. भारताच्या काही जिगरबाज वैमानिकांनी हे आव्हान स्विकारले. या वैमानिकांमध्ये एक महाडकर होता. भारतातून ज्या पहिल्या विमानाने युक्रेनच्या दिशेने झेप घेतली होती त्या विमानाचा वैमानिक होता सुमित माळवदे (Sumit Malavade). महाड शहरातील तांबड भुवन येथे त्याचे कुटुंब राहायचे.

    वैमानिकच व्हायचे हे सुमितचे लहानपणापासूनचे स्वप्न. शास्त्र शाखेतून त्याने पदवी घेतली. नंतर निसर्गोपचाराचा पदविका अभ्यासक्रम त्याने पूर्ण केला. क्लिनिकत हिप्नोथेरपीचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम देखील त्याने केला आहे. हे सर्व शिक्षण घेत असताना, आपल्याला वैमानिक व्हायचे आहे याचा विसर त्याने कधी पडू दिला नाही. जिद्दीने विमान उड्डणाचे प्रशिक्षण पूर्ण करित व्यावसायिक वैमानिक म्हणून त्याने परवाना मिळवला. २०१७ मध्ये तो एअर इंडियामध्ये वैमानिक म्हणून रुजू झाला. आतापर्यंत बावीसशे तास विमान उड्डाणांचा अनुभव सुमितच्या गाठीला आहे.

    रशियाने युक्रेनवर २३ फेब्रुवारीला हल्ला केला. युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्याना सुखरूप भारतात परत आणण्याची मोहीम भारत सरकारने हाती घेतली. २६ फेब्रुवारीला एअर इंडियाच्या बोइंग ७८७ ड्रीमलायनरने युक्रेन सीमेवरील रुमानियाची राजधानी बुडापेस्टच्या दिशेने झेप घेतली. अन्य पाच वैमानिकांबरोबर या विमानाचे सुकाणू सांभाळत होता महाडकर सुमित माळवदे. सोबत होते १४ क्रु मेंबर, तीन इंजिनिअर आणि दोन सुरक्षा रक्षक. युक्रेनमधून मिळेल त्या मार्गाने, प्रसंगी पायपीट करुन रुमानियाची राजधानी बुखारेस्ट विमानतळापर्यंत पोहोचलेल्या २४९ विद्यार्थ्यांना घेवून २७ फेब्रुवारीला हे विमान दिल्लीतील इंदिरा गांधी अंतर राष्ट्रीय विमानतळावर पोहोचले. नागरी विमान उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंदीया त्यांचे स्वागत करण्यासाठी विमानतळावर हजर होते. या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या चेहेऱ्यावरील आनंद खूप समाधान देणारा होता असे सुमित सांगतो.

    सुमितचे कर्तुत्व एवढ्यापुरतेच मर्यादित नाही. कोरोना काळात जगातील विविध देशांमध्ये अडकलेल्या भारतीयांना वंदे भारत मिशन राबविण्यात आले. या मिशनअंतर्गत पन्नास उड्डाणे करुन विविध देशांतून भारतीयांना परत आणण्याचे कामही सुमितने फत्ते केले आहे. याच काळात व्हेंटीलेटर्स आणि लसीचा कच्चा माल आणण्याची जबाबदारी देखील सुमितने पार पाडली आहे.महाडकरांनाच नव्हे तर रायगडकरांना देखील अभिमान वाटावा असेच सुमितचे कर्तुत्व आहे.