Ukrainian President Zelensky Murder?

गेल्या 24 दिवसांपासून युक्रेनची राजधानी किव्ह ताब्यात घेण्यासाठी रशियन सैन्य प्रयत्न करीत आहे परंतु युक्रेनी सैन्याच्या चिवट प्रतिकारापुढे त्यांना यश आलेले नसतानाच रशियाच्या पाचव्या जनरलचा युद्धात मृत्यू झाल्यानंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांचा संयमही सुटला आहे. शनिवारी रशियाने युक्रेनवर हायपरसोनिक मिसाईल डागल्याचा दावा केला. रशियाचे पाचवे जनरल एंद्रेई मोरदविचेव हे युक्रेनमध्ये मारले गेले आहेत(Hypersonic Missile Attack on Ukraine! Putin angry over fifth Russian general's death 600 civilians killed, thousands injured, 1.5 million left the country).

  किव्ह : गेल्या 24 दिवसांपासून युक्रेनची राजधानी किव्ह ताब्यात घेण्यासाठी रशियन सैन्य प्रयत्न करीत आहे परंतु युक्रेनी सैन्याच्या चिवट प्रतिकारापुढे त्यांना यश आलेले नसतानाच रशियाच्या पाचव्या जनरलचा युद्धात मृत्यू झाल्यानंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांचा संयमही सुटला आहे. शनिवारी रशियाने युक्रेनवर हायपरसोनिक मिसाईल डागल्याचा दावा केला. रशियाचे पाचवे जनरल एंद्रेई मोरदविचेव हे युक्रेनमध्ये मारले गेले आहेत(Hypersonic Missile Attack on Ukraine! Putin angry over fifth Russian general’s death 600 civilians killed, thousands injured, 1.5 million left the country).

  किंझल हे हायपरसोनिक मिसाईल डागवून युक्रेनच्या मिसाईल आणि विमानांच्या शस्त्रांचे मोठे भांडार उद्‌ध्वस्त केल्याचा दावा रशियाने केला. या हल्ल्यानंतर अमेरिकेने रशिया युक्रेनविरोधात अण्वस्त्रांचा वापर करू शकतो, असा इशारा दिला आहे.

  एअर डिफेन्स सिस्टम भेदण्याची क्षमता

  किंझल हे एक अद्ययावत क्षेपणास्त्र असून, त्याचा वेग हा आवाजाच्या वेगापेक्षा 10 पटीने जास्त आहे, तसेच ते एअर डिफेन्स सिस्टीमला सुद्धा भेदू शकते अशी माहिती स्वत: पुतिन यांनी दिली आहे. पुतिन यांच्या कार्यकाळाच्या सुरुवातीलाच देशाच्या संरक्षण विभागाला सुपूर्द करण्यात आलेल्या वेगवेगळ्या क्षेपणास्त्रांपैकी किंझल हे एक क्षेपणास्त्र आहे.

  ..तर पश्चिम युरोपलाही धोका

  पुतीन यांचे सैन्य नवीन अणुबॉम्बवर काम करत आहे, असा अणुबॉम्ब जो युरोपचे संरक्षण कवच भेदू शकेल, असा दावा अमेरिकेने केला आहे. या अणुबॉम्बद्वारे पुतीन पश्चिमी देशांना भयंकर नुकसान करू शकतात, असे अमेरिकेच्या संरक्षण गुप्तचर संस्थेचे संचालक लेफ्टनंट जनरल स्कॉट बॅरियर यांनी सांगितले.

  112 मुलांचा मृत्यू, 140 जखमी

  रशियाकडून युक्रेनवर सुरू असलेल्या हल्ल्यात आतापर्यंत 112 मुलांचा मृत्यू झाला आहे. तर 140 मुले जखमी झाली असल्याची माहिती युक्रेनियन अभियोजक जनरल कार्यालयाने दिली आहे. युनिसेफने दिलेल्या माहितीनुसार, रशियाच्या हल्ल्यामुळे युक्रेनमधून 15 लाखांहून अधिक मुलांना त्यांच्या कुटुंबासोबत देश सोडून जावा लागला आहे. बहुतांश युक्रेनियन कुटुंबांनी पोलंड, हंगेरी, स्लोव्हाकिया, मोल्दोव्हा आणि रोमानियामध्ये आश्रय घेतला आहे.