वीस शहरांमधून रशियन सैन्याची पिछेहाट; युक्रेन आघाडीवर

रशियन सैन्याच्या बाजूने आणि युक्रेनच्या विरोधात लढणारे चेचेन सैन्य कमांडर रमजान कादयारोव म्हणाले, पूर्व आघाडीवर पराभवाचा झटका बसला. रशियन कमांडर पुतीन यांना युक्रेन आघाडीबाबत अंधारात ठेवत आहेत. रशियन सैन्य मजबूत स्थितीत असल्याची चुकीची माहिती देण्यात आली.

    मॉस्को : युक्रेनने (Ukraine) रशियाच्या ताब्यातील २० शहरांची सुटका केली आहे. आता केवळ दक्षिणेकडील डोनबासचा (Donbas) भाग रशियाच्या ताब्यात आहे. युक्रेन सरकारचे प्रवक्ते म्हणाले, खारकीव्हमध्ये (Kharkiv) रशियन सैन्य शरणागतीस (Surrender Russian army) तयार आहे. युक्रेनच्या आघाडीवर रशियन सैन्याच्या पायाखालील वाळू घसरत असल्याचे पाहून व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) यांच्यावर देशांतर्गत टीका वाढली आहे. रशियाच्या संसदेतील पुतीन यांच्या पक्षाचे सर्गेई मिरोनाव्ह (Sergey Mironov) यांनी त्यांच्यावर आरोप केला. चुकीच्या निर्णयामुळे रशियन सैन्याला युक्रेन आघाडी फत्ते करता आली नाही.

    रशियन सैन्याच्या बाजूने आणि युक्रेनच्या विरोधात लढणारे चेचेन सैन्य कमांडर रमजान कादयारोव म्हणाले, पूर्व आघाडीवर पराभवाचा झटका बसला. रशियन कमांडर पुतीन यांना युक्रेन आघाडीबाबत अंधारात ठेवत आहेत. रशियन सैन्य मजबूत स्थितीत असल्याची चुकीची माहिती देण्यात आली.

    खारकीव्हसह पूर्व भागात युक्रेनच्या लष्कराने अमेरिकेच्या हार्म क्षेपणास्त्राद्वारे रशियन सैन्यावर हल्ला केला. लढाऊ विमानातून डागल्या जाणाऱ्या हायस्पीड अँटी रेडिएशन क्षेपणास्त्राचा ताशी वेग २३०० किमी एवढा आहे. हे क्षेपणास्त्र शत्रूच्या रडारला लक्ष्य करते. अमेरिकेने युक्रेनला अशी १२०० क्षेपणास्त्रे दिली आहेत.

    रशिया युक्रेनविरोधात सायबर हल्ला करण्याची शक्यता आहे. पूर्वेकडील आघाडीवर पराभूत झाल्यामुळे भडकलेला रशिया रासायनिक हल्ला करू शकतो. सोमवारी सायंकाळी रशियन सैन्याने खारकीव्हमध्ये जल-विद्युत पुरवठ्याच्या ठिकाणांवरील हल्ले वाढवले आहेत. युक्रेनच्या ताब्यातील शहरांवर लवकरच ताबा मिळवला जाणार आहे.