रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात युक्रेनच्या १७ जणांचा मृत्यू

व्हिनित्शिया (Vinnitsia) शहरावर रशियाने सात क्षेपणास्त्रे डागली. त्यापैकी तीन क्षेपणास्त्रे एक सरकारी कार्यालय आणि त्याजवळच्या रहिवासी इमारतींवर कोसळली. यामध्ये १७ जणांचा मृत्यू झाला असून ९० हून अधिक जण जखमी झाले.

    किव्ह : रशियाच्या (Russia) युक्रेनच्या (Ukraine) मध्य भागातील व्हिनित्शिया या शहरावर क्षेपणास्त्र हल्ला (Missile Attack) केला. यामध्ये १७ जणांचा मृत्यू झाला असून ९० हून अधिक जण जखमी झाले. रशियाकडून वारंवार ‘दहशतवादी’ (Terrorist) हल्ले होत असल्याची टीका युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदीमिर झेलेन्स्की (Volodymyr Zelensky) यांनी केली आहे.

    व्हिनित्शिया (Vinnitsia) शहरावर रशियाने सात क्षेपणास्त्रे डागली. त्यापैकी तीन क्षेपणास्त्रे एक सरकारी कार्यालय आणि त्याजवळच्या रहिवासी इमारतींवर कोसळली. क्षेपणास्त्रांचा स्फोट झाल्यानंतर इमारतींच्या पार्किंगमध्ये असलेल्या सुमारे ५० मोटारींना आग लागली. उर्वरित चार क्षेपणास्त्रे युक्रेनच्या हवाई संरक्षण प्रणालीद्वारे (Air Defense System) हवेतच नष्ट करण्यात आली. मात्र, इमारतींवर झालेल्या हल्ल्यात एका लहान बालकासह १७ जणांचा मृत्यू झाला. जखमी झालेल्या ९० जणांपैकी काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सूत्रांनी सांगितले.