
मागील आठवड्यापासून युक्रेन सैन्याची जलद आगेकूच सुरू आहे. त्यामुळे युद्धाची चित्रे पालटण्याची शक्यता असून युक्रेनच्या सैन्याने प्रतिकार करत खारकीवचे तळ आणि मार्ग पुन्हा ताब्यात घेतला आहे. त्यामुळे कोंडी होऊ नये यासाठी रशियाने आपले सैन्य मागे घेतले आहे. हे युक्रेनच्या सैन्यांचे मोठे यश असून पुतीन यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.
किव्ह : रशिया-युक्रेन युद्धाला सहा महिने उलटले आहेत. मात्र, कुणीच माघार घ्यायला तयार नाही. रशियाने केलेल्या हल्ल्याला युक्रेनकडून जोरदार प्रत्युत्तर (Ukraine Reply) देण्यात येत आहे. प्रतिहल्ल्यामुळे युक्रेनमधील दुसरे महत्त्वाचे शहर असलेल्या खारकीव्हमधून (Kharkiv) रशियाला सैन्य (Russian Army) माघारी घेण्याची वेळ आली आहे.
मागील आठवड्यापासून युक्रेन सैन्याची जलद आगेकूच सुरू आहे. त्यामुळे युद्धाची चित्रे पालटण्याची शक्यता असून युक्रेनच्या सैन्याने प्रतिकार करत खारकीवचे तळ आणि मार्ग पुन्हा ताब्यात घेतला आहे. त्यामुळे कोंडी होऊ नये यासाठी रशियाने आपले सैन्य मागे (Behind Army) घेतले आहे. हे युक्रेनच्या सैन्यांचे मोठे यश असून पुतीन (Vladimir Putin) यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.
फेब्रुवारीमध्ये हल्ला केल्यानंतर काही दिवसांतच युक्रेनचा ताबा हातात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. रशियाला युक्रेनी सैनिकांच्या चिवट प्रतिकारामुळे आणि उर्वरित जगाने टाकलेल्या निर्बंधांमुळे मर्यादित यश मिळाले आहे. युद्धाला सहा महिने उलटून गेल्यानंतरही रशियाला युक्रेनचा पूर्वेकडील भाग आणि दक्षिणेकडील काही भाग ताब्यात घेता आला आहे. मात्र, युक्रेनी सैनिकांनी ऑगस्टच्या अखेरपासून सुरु केलेल्या प्रतिहल्ल्यांमुळे हा ताब्यात आलेला भागही रशियाच्या हातून निसटत आहे. युक्रेनी सैनिकांनी केलेल्या जोरदार हल्ल्यामुळे रशियावर खारकिव्ह या मोठ्या शहरातून सैन्यमाघारी जाहीर करण्याची नामुष्की ओढविली आहे.