युक्रेनचे गुप्तचर विभाग आणि न्यायविभाग प्रमुख निलंबित; राष्ट्राध्यक्षांची कारवाई

‘गुप्तचर विभागातील आणि न्यायविभागातील साठपेक्षा अधिक अधिकारी रशियाच्या नियंत्रणाखालील प्रदेशात राहून युक्रेनविरोधात कारवाया करत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. ही बाब देशासाठी अत्यंत धोकादायक आहे. त्यामुळे या विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांबद्दलही संशय निर्माण होत आहे, असे झेलेन्स्की यांनी सांगत निलंबनाची कारवाई केली.

    व्हिनित्शिया (युक्रेन) : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोदीमिर झेलेन्स्की (President of Ukraine Volodymyr Zelensky) यांनी गुप्तचर विभागाच्या प्रमुख (Head Of Intelligence Department) आणि न्यायविभागाच्या (Head Of Justice Department) प्रमुखांना निलंबित (Suspended) केले. त्यांच्या विभागातील अधिकाऱ्यांनी युक्रेनविरोधात रशियाला मदत केल्याचा आरोप (Accuded Of Aiding Russia) ठेवण्यात आला आहे. झेलेन्स्की यांनी व्हिडिओद्वारे जनतेशी संवाद साधताना निलंबनाच्या कारवाईची घोषणा केली.

    ‘गुप्तचर विभागातील आणि न्यायविभागातील साठपेक्षा अधिक अधिकारी रशियाच्या नियंत्रणाखालील प्रदेशात राहून युक्रेनविरोधात कारवाया करत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. या अधिकाऱ्यांचे आणि रशियाच्या अधिकाऱ्यांशी असलेले संबंधही उघड झाले आहेत. ही बाब देशासाठी अत्यंत धोकादायक आहे. त्यामुळे या विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांबद्दलही संशय निर्माण होत आहे, असे झेलेन्स्की यांनी सांगत निलंबनाची कारवाई केली.

    गुप्तचर विभागाचे प्रमुख इव्हान बाकानोव्ह हे झेलेन्स्की यांचे बालमित्र असून त्यांचे ते व्यावसायिक भागीदारही होते. युक्रेन-रशिया युद्ध सुरु झाल्यापासून बाकानोव्ह यांनी सुरक्षा नियमांचा वारंवार भंग केल्याचे दिसून आले आहे. न्यायविभागाच्या प्रमुख इरिना व्हेनेदिक्तोव्हा यांच्यावरही निष्काळजीपणाचा ठपका ठेवत निलंबनाची कारवाई करण्यात आली.