पुतीन यांच्याविरोधात रशियात जोरदार निदर्शने; नागरिकांचा ‘नो टू वॉर’

पुतीन यांनी २१ सप्टेंबरला रशियाचे चार लाख राखीव सैन्य युद्धात उतरवण्याची घोषणा केल्यानंतर मॉस्को, सेंट पीट्सबर्गसह ३८ शहरांत हजारो नागरिकांनी रस्त्यावर येत ‘नो टू वॉर’ अशा घोषणा देत, पुतीन यांच्याविरोधात निदर्शने केली.

    मॉस्को : रशिया आणि युक्रेनमध्ये (Russia-Ukraine War) गेल्या सात महिन्यांपासून सुरू असलेल्या युद्धात व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) यांनी राखीव सैन्य (Reserve Army) उतरवण्याची घोषणा केली आहे. त्याविरोधात रशियामध्ये विविध ठिकाणी जोरदार निदर्शने (Strong Protests) सुरू आहेत. पुतीन यांनी २१ सप्टेंबरला रशियाचे चार लाख राखीव सैन्य युद्धात उतरवण्याची घोषणा केल्यानंतर मॉस्को, सेंट पीट्सबर्गसह ३८ शहरांत हजारो नागरिकांनी रस्त्यावर येत ‘नो टू वॉर’ (No To War) अशा घोषणा देत, पुतीन यांच्याविरोधात निदर्शने केली.

    पुतीन यांच्या विरोधात करण्यात आलेल्या आंदोलकांना पांगवण्यासाठी अनेक ठिकाणी पोलिसांना लाठीमारही करावा लागला. या निदर्शनादरम्यान पोलिसांनी संपूर्ण देशभरात तेराशेहून अधिक नागरिकांना ताब्यात घेतले असल्याचा दावा काही माध्यमांनी केला आहे.

    पोलिसांनी निदर्शने करणाऱ्यांना शांततेचे आवाहन करत घरी परत जाण्याच्या सूचनादेखील दिल्या. मात्र निदर्शने तीव्र होत गेल्याने पोलिसांना लाठीमार करावा लागला. पुतीन यांच्याविरुद्धच्या निदर्शनांवेळी पोलिसांनी काही महिलांना फरपटत नेल्याचा व्हिडिओ व्हायरल झाले असून त्यामुळे पोलिस यंत्रणेवर टीका होत आहे.