
जेलेन्स्की पुढे म्हणाले की, ''मला आतापर्यंत अमेरिकेने खूप काही दिले, आता मी आणखी एक मागणी करत आहे. युक्रेनवर नो फ्लाय झोनचा नियम लागू करा. हा नियम लागू केल्यावर रशिया आमच्यावर हल्ला करू शकणार नाही. रशियाकडून हल्ल्यासाठी ड्रोनचा वापर केला जातोय. मला माझ्या देशाचे रक्षण करायचे आहे.
वॉशिंग्टन: रशियासोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमीर जेलेन्स्की यांनी अमेरिकन संसदेला संबोधित केले. यादरम्यान सर्व अमेरिकन खासदारांनी जेलेन्स्की यांना उभे राहून अभिवादन केले. यावेळी झेलेन्स्की म्हणाले की, ”आम्हाला युद्ध नकोय, युद्ध थांबायला हवे. युद्ध थांबवण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत. पण, रशिया ऐकायला तयार नाही. ते सातत्याने आमच्यावर क्षेपणास्त्रांचा वापर करत आहे.”
‘युक्रेनवर नो फ्लाय झोन नियम लागू करा’
जेलेन्स्की पुढे म्हणाले की, ”मला आतापर्यंत अमेरिकेने खूप काही दिले, आता मी आणखी एक मागणी करत आहे. युक्रेनवर नो फ्लाय झोनचा नियम लागू करा. हा नियम लागू केल्यावर रशिया आमच्यावर हल्ला करू शकणार नाही. रशियाकडून हल्ल्यासाठी ड्रोनचा वापर केला जातोय. मला माझ्या देशाचे रक्षण करायचे आहे. अमेरिकेच्या लोकांना वाटत असेल की, आम्ही आमच्या स्वातंत्र्याचे रक्षण केले पाहिजे, तर आमच्यासोबत या आणि युक्रेनच्या लोकांना मदत करा,”असे आवाहनही जेलेन्स्की यांनी यावेळी केले.