
गेल्या काही महिन्यांमध्ये त्यांची प्रकृती खालावली (Vladimir Putin) आहे. आज युद्धाच्या वर्षपूर्ती निमित्त ते रशियाला संबोधणार आहेत. त्यांची प्रकृती स्थिर नसल्यामुळे हा कार्यक्रम पुढे ढकलला जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
युक्रेन-रशिया युद्धाला (Russia Ukraine War) काल (२० फेब्रुवारी) एक वर्ष पूर्ण झालं. या युद्धाची घोषणा केल्यानंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन (Vladimir Putin) खूप चर्चेत आले होते. या निर्णयामुळे त्यांच्यावर खूप टीका झाली होती. युद्ध सुरु केल्यामुळे रशियाच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा मोठा परिणाम झाला होता. तरीही पुतिन खंबीरपणे देशाचे नेतृत्त्व करत होते. गेल्या काही महिन्यांमध्ये त्यांची प्रकृती खालावली (Vladimir Putin) आहे. आज युद्धाच्या वर्षपूर्ती निमित्त ते रशियाला संबोधणार आहेत. त्यांची प्रकृती स्थिर नसल्यामुळे हा कार्यक्रम पुढे ढकलला जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
एसव्हीआर या रशियन टेलिग्राम चॅनलच्या आधारे द मिररने पुतिन यांच्या आरोग्यासंबंधित माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या अहवालानुसार, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना कॅन्सरसह अनेक आजार झाले आहेत. त्यांच्यावर खासगी पद्धतीने उपचार सुरु असल्याने अनेक नियोजित कार्यक्रमांमध्ये बदल करण्यात आले होते. गेल्या आठवड्यामध्ये त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. या नव्या चाचणीच्या आधारे उपचारांमध्ये नव्या पद्धतीचा वापर केला जाणार आहे.हे उपचार ५ मार्चपासून सुरु होणार असल्याची माहिती मिळाली आहे.
पुतिन यांच्या आजारपणाचा प्रभाव युक्रेन-रशिया युद्धावर होणार असल्याचा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. रशियाच्या युद्धनीतीमध्ये 2023 च्या सुरुवातीला बदल होणार होते. आजच्या सभेमध्ये ते युद्धासंबंधित घोषणा करणार आहेत असे म्हटले जात आहे. त्यांच्या या सभेचे लाइव्ह प्रसारण करण्यात येत आहे. लाइव्ह भाषणामध्ये ते आजारी असल्याचे स्पष्टपणे दिसून आले. भाषणामध्ये त्यांनी युद्धासह अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. तसेच अमेरिकचे अध्यक्ष जो बायडेन यांच्यावर जोरदार टीका केली.
रशिया आणि चीन यांचे चांगले संबंध असल्याने वर्षभरापासून सुरु असलेल्या युद्धामध्ये चीन रशियाची विनाशकारी हत्यारे देऊन मदत करु शकतो. युक्रेनच्या विरोधामध्ये रशियाने या शस्त्रांचा जर वापर केला तर तिसऱ्या महायुद्धाला सुरुवात होऊ शकते, अशी चिंता व्यक्त केली जात आहे, असे घडू नये यासाठी सगळ्या देशांकडून प्रयत्न केले जात आहेत.