“खुनी पुतीनला याची किंमत मोजावी लागेल”, बायडेन यांच्या वक्तव्यानंतर रशियाचा राजदूत मॉस्कोला माघारी

बायडेन यांनी व्लादिमीर पुतीन यांना निवडणुकीत हस्तक्षेप करण्यासाठी “किंमत मोजावी लागणार” असे वक्तव्य केले होते. यानंतर रशियाने बुधवारी आपल्या अमेरिकेतील राजदूताला सल्लामसलत करण्यासाठी पुन्हा मॉस्कोला बोलावले आहे. या निवडणुकीमुळे अमेरिकेत राजकीय तणाव निर्माण झाला होता.

    अमेरिकचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अमेरिकेच्या गुप्तचर अहवालाविषयी विचारले गेले होते. यामध्ये नोव्हेंबर २०२० च्या निवडणुकीत रशियन नेत्याने बायडेन यांच्या उमेदवारीला हानी पोहचविण्याचा आणि डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रचार करण्याचा प्रयत्न केला होता , असे सांगितले. बायडेन यांनी व्लादिमीर पुतीन यांना निवडणुकीत हस्तक्षेप करण्यासाठी “किंमत मोजावी लागणार” असे वक्तव्य केले होते. यानंतर रशियाने बुधवारी आपल्या अमेरिकेतील राजदूताला सल्लामसलत करण्यासाठी पुन्हा मॉस्कोला बोलावले आहे. या निवडणुकीमुळे अमेरिकेत राजकीय तणाव निर्माण झाला होता.

    विरोधी पक्षनेते अलेक्सी नॅव्हेली आणि इतर प्रतिस्पर्ध्यांच्या विष दिल्याच्या आरोपाखाली पुतीन हे “दोषी” आहेत का, असे विचारले असता बायडेन म्हणाले की, हो मी मानतो की ते दोषी आहेत. यांनतर रशियाने आपल्या राजदूताला घरी बोलावून घेतले आहे. रशियन परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, “वॉशिंग्टनमधील रशियन राजदूत एनाटोली अँटोनोव्ह यांना अमेरिकेबरोबरच्या संबंधांच्या संदर्भात काय केले पाहिजे याचे विश्लेषण करण्याच्या उद्देशाने मॉस्कोला येण्यास आमंत्रित केले आहे.”