sarah gilbert

कोरोना लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञ डेम सारा गिल्बर्ट (Sarah Gilbert Gave Warning About Next Pandemic) यांनी आगामी काळात जीवघेणी साथ(Next Pandemic May Be More Lethal) येणार असल्याचा गंभीर इशारा दिला आहे. त्या ४४ व्या डिम्बलबी व्याख्यानात बोलत होत्या.

    ओमायक्रॉनच्या (Omicron Spread)वाढत्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर ऑक्सफर्ड-एस्ट्रोजेनेका कोरोना लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञ डेम सारा गिल्बर्ट(Sarah Gilbert Gave Warning About Next Pandemic) यांनी आगामी काळात जीवघेणी साथ(Next Pandemic May Be More Lethal) येणार असल्याचा गंभीर इशारा दिला आहे. त्या ४४ व्या डिम्बलबी व्याख्यानात बोलत होत्या. यावेळी त्यांनी अशा साथीरोगांच्या तयारीसाठी निधीची गरज असल्याचं सांगत निधी उपलब्ध झाला तरच हा प्रकोप थांबवता येईल असंही नमूद केलं.

    सारा गिल्बर्ट यांनी नव्या कोरोना विषाणूमुळे कोरोना विरोधी लसीची परिणामकारकता कमी होऊ शकते, असंही सांगितलं. गिल्बर्ट म्हणाल्या, “जोपर्यंत कोरोनाच्या नव्या विषाणूबाबत अधिक माहिती समोर येत नाही तोपर्यंत नागरिकांनी सावधगिरीने वागलं पाहिजे. एखाद्या विषाणूमुळे आपल्या उपजीविकेला आणि जीवालाच धोका निर्माण होण्याची ही काही पहिली वेळ नाही. खरंतर हे आहे की आगामी काळात येणारा साथीरोग यापेक्षाही वाईट असेल. हा आजार अधिक संसर्गजन्य आणि घातक असेल.”

    “या साथीरोगाच्या वेळी आपण जे पाहिलंय ते आगामी काळात पुन्हा पाहायला लागण्याच्या स्थितीत आपण जाऊ शकत नाही. करोनामुळे झालेल्या आर्थिक नुकसानीमुळे आपल्याकडे साथीरोगांचा सामना करण्यासाठी पैसे नाहीत. आपण कोरोनातून जे शिकलो आहे त्यातून आपण खूप काही शिकलं पाहिजे,” असं गिल्बर्ट यांनी सांगितलं.

    ओमायक्रॉन विषाणूवर अँटिबॉडीचा परिणाम होईल का यावर बोलताना सारा गिल्बर्ट म्हणाल्या, “या विषाणूच्या स्पाईक प्रोटिनमध्ये अनेक बदल झाले आहेत. त्यामुळे या विषाणूची संसर्ग क्षमता वाढली आहे. या विषाणूची रचना वेगळी असल्यानं करोना विरोधी लसीमुळे शरीरात तयार झालेली रोगप्रतिकारक शक्ती या विषाणूंचा संसर्ग रोखू शकणार नाही, असंही होऊ शकतं.”