धक्कादायक ! मॅक्सिकोमध्ये मातृभाषा बोलल्याबद्दल विद्यार्थ्याला जिवंत जाळले

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ही घटना जूनमध्ये घडली होती आणि गंभीर भाजलेल्या जुआन जामोरानो या विद्यार्थ्याला आता रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. वर्गात आपल्या जागेवर बसलेला असताना त्याची पँट ओली झाली. त्याने पाहिले तर इतर दोन विद्यार्थ्यांनी त्याच्या सीटवर दारू ओतली होती.

    नवी दिल्ली – मॅक्सिकोमधील एका शाळेत १४ वर्षीय विद्यार्थ्याला त्याच्या दोन सहकाऱ्यांनी वर्गात जिवंत जाळल्याची घटना घडली आहे. संबंधित विद्यार्थी आपल्या मातृभाषेतून त्यांच्याशी बोलत असल्याने दोन्ही विद्यार्थ्यांनी त्याला जिवंत जाळले.

    अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ही घटना जूनमध्ये घडली होती आणि गंभीर भाजलेल्या जुआन जामोरानो या विद्यार्थ्याला आता रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. वर्गात आपल्या जागेवर बसलेला असताना त्याची पँट ओली झाली. त्याने पाहिले तर इतर दोन विद्यार्थ्यांनी त्याच्या सीटवर दारू ओतली होती. जामोरानो आपल्या जागेवरून उठताच दोन्ही विद्यार्थ्यांनी त्याला पेटवून दिले, असे जामोरानोच्या कुटुंबीयांनी सांगितले.

    जामोरानोच्या पालकांनी सांगितले की, आमचा मुलगा अनेक आठवड्यांपासून शाळेत वर्णद्वेषी टिप्पण्यांचा सामना करत होता. शाळेतील शिक्षकांनीही त्याचा छळ केला. आपण त्यांच्या दर्जाचे किंवा वंशाचे नाही असे त्यांना वाटे. कुटुंबीयांनी शाळेचे अधिकारी आणि जामोरानोला जाळणाऱ्या विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल केला आहे.