gunman opens fire in russia

रशियातील पर्ममधील(Perm State University) एका विद्यापीठात एका बंदूकधारी व्यक्तीने गोळीबार केल्याने ८ जण ठार(8 Dead And 6 Injured In Shooting) आणि ६ जण जखमी झाल्याची बातमी मिळाली आहे.

    एका अज्ञात व्यक्तीने आज रशियन विद्यापीठामध्ये(Russian University) गोळीबार केल्याची माहिती मिळाली आहे. (Shooter Opens Fire In Russian University). या गोळीबारामध्ये ८ जणांचा मृत्यू झाला आहे. रशियातील पर्ममधील(Perm State University) एका विद्यापीठात एका बंदूकधारी व्यक्तीने गोळीबार केल्याने ८ जण ठार(8 Dead And 6 Injured In Shooting) आणि ६ जण जखमी झाल्याची बातमी मिळाली आहे.

    विद्यापीठाचे प्रवक्ते आणि पोलिसांनी सांगितलं, की मॉस्कोच्या १,३०० किलोमीटर पूर्वेला पर्म स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये घडलेल्या घटनेनंतर गोळीबार करणाऱ्याला ताब्यात घेण्यात आले.या गोळीबाराच्या व्हिडिओ फुटेजमध्ये विद्यार्थी इमारतीतून बाहेर पडण्यासाठी पहिल्या मजल्यावरील खिडक्यांमधून उड्या घेताना दिसत आहेत. जीव वाचवण्यासाठी अनेक विद्यार्थ्यांनी खिडकीतून उड्या मारल्या.

    रशियातील एजन्सीनं सांगितलं की, बंदुक घेऊन गोळीबार करणारा माणूस हा विद्यापिठातील एक विद्यार्थी आहे. रशियातील नागरिकांना बंदूक स्वतःजवळ बाळगण्यास परवानगी नाही. मात्र शिकार, स्वरक्षण आणि खेळासाठी ती खरेदी करण्याची मुभा आहे.