नात्याला काळिमा फासणारी घटना -१६ वर्षांच्या मुलाने नशेत आपल्या आईवरच केला बलात्कार

एका १६ वर्षांच्या मुलाने नशेमध्ये आपल्या आईवरच बलात्कार(Son Raped His Mother) केला आहे. त्या मुलाच्या आईने स्वत: पोलीस स्टेशनमध्ये फोन करुन याविषयी माहिती दिली आहे.

    मॅड्रीड: स्पेनच्या(Spain) लास पालमसजवळ एक भयानक घटना घडली आहे. या भागातील एका १६ वर्षांच्या मुलाने नशेमध्ये आपल्या आईवरच बलात्कार(Son Raped His Mother) केला आहे. त्या मुलाच्या आईने स्वत: पोलीस स्टेशनमध्ये फोन करुन याविषयी माहिती दिली आहे.

    या मुलाला जेव्हा कोर्टात आणण्यात आले तेव्हा त्याने बलात्कार करताना ड्रग्सच्या नशेत असल्याचे सांगितले. नशेत असल्यामुळे आईवर केलेल्या बलात्काराबाबत काहीच आठवत नसल्याचे सांगितले. नशेमुळे तेव्हा काय घडले हे अजिबात स्मरणात नसल्याचे तो मुलगा म्हणाला.

    या संपूर्ण प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, मंगळवारी लास पालमसमधून एका मुलाला आम्ही ताब्यात घेतले आहे. या मुलावर आपल्याच आईवर बलात्कार केल्याचा आरोप आहे.

    सध्या या मुलाची चौकशी सुरु आहे. मुलगा अल्पवयीन असल्यामुळे त्याचे नाव सांगण्यात आलेले नाही. मुलगा स्पेनचाच नागरिक आहे की अन्य कुठल्या देशाचा नागरिक आहे हे अजून सांगण्यात आले नाही.

    आरोपीला सध्या पोलीस रिमांडमध्ये पाठवण्यात आले आहे. या आरोपी मुलावरचे आरोप सिद्ध झाले तर ही घटना खरचं विचार करण्यासारखी आहे.