South Korea's artificial sun made the maximum; Set a new world record

अक्षय ऊर्जेचा सर्वात मोठा स्त्रोत म्हणून सुर्याकडे पाहिले जाते. मात्र, या ऊर्जेचा वापर करताना अनेक अडचणी येतात. प्रत्येक ठिकाणी किंवा गरजेप्रमाणे याचा वापर करता येत नाही. ही समस्या सोडवण्यासाठी जगभरातील वैज्ञानिक संशोधन करत आहेत. त्यातूनच दक्षिण कोरियातील या कृत्रिम सूर्याचा जन्म झाला आहे.

नवी दिल्ली : दक्षिण कोरियाच्या कृत्रिम सूर्याने नवा इतिहास रचला आहे. १० कोटी डिग्री सेल्सिअस तापमान २० सेकंदांपर्यंत कायम ठेवत नवा जागतिक विक्रम नोंदवला आहे.

अक्षय ऊर्जेचा सर्वात मोठा स्त्रोत म्हणून सुर्याकडे पाहिले जाते. मात्र, या ऊर्जेचा वापर करताना अनेक अडचणी येतात. प्रत्येक ठिकाणी किंवा गरजेप्रमाणे याचा वापर करता येत नाही. ही समस्या सोडवण्यासाठी जगभरातील वैज्ञानिक संशोधन करत आहेत. त्यातूनच दक्षिण कोरियातील या कृत्रिम सूर्याचा जन्म झाला आहे.

आण्विक आणि न्यूक्लियर ऊर्जेला एक चांगला स्त्रोत मानून सूर्याप्रमाणे पृथ्वीवर न्यूक्लियर फ्युजनद्वारे ऊर्जा निर्माण करण्याचा प्रयोग येथील वैज्ञानिक करत आहेत.

दक्षिण कोरियाच्या या कृत्रिम सूर्याने उच्च तापमानाचा प्लाझ्मा २० सेकंदापर्यंत कायम ठेवण्याचा नवा जागतिक विक्रम केला आहे. याचे कारण म्हणजे या कृत्रिम सूर्याचं तापमान १०० मिलियन (१० कोटी) डिग्री सेल्सिअसपेक्षा अधिक आहे. याची खऱ्या सूर्याशी तुलना केल्यास सूर्याच्या गाभ्याचे तापमान हे केवळ १५ मिलियन (१.५ कोटी) डिग्री सेल्सिअस इतके आहे.

दक्षिण कोरियाने विकसित केलेला हा कृत्रिम सूर्य म्हणजे एक उपकरण असून याला ” KSTAR” (Kora Superconducting Toakamak Advanced Research) असं म्हणतात. या उपकरणाने १० कोटी डिग्री सेल्सिअस तापमान २० सेकंदांपर्यंत कायम ठेवलं. जे यापूर्वी १० सेकंदांपर्यंतही कायम ठेवलं जाऊ शकत नव्हतं.

न्यूक्लियर फ्युजनच्या या उपकरणातून मिळवलेली ऊर्जा व्यावसायिक कारणांसाठी खूपच महत्वाची उपलब्धता ठरणार आहे. KSTAR आपल्या प्रयोगातील प्रमुख निकाल हे जगभरातील संशोधकांसोबत शेअर करणार आहे. पुढील वर्षी मे महिन्यांत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय आण्विक ऊर्जा असोसिएशनच्या फ्यूजन एनर्जी कॉन्फरन्समध्ये वैज्ञानिक आपल्या यशाची माहिती जाहीर करणार आहेत.