Spain: Roman Gold Coins in Sea

समुद्राच्या निळ्याशार पाण्याखाली किती रहस्ये दडली आहेत, याची कल्पना न केलेलीच बरी. कारण समुद्रात सातत्याने काही ना काही तरी गूढ सापडतच असते. स्पेनच्या समुद्रात नुकताच सोन्याच्या नाण्यांचा खजिना सापडला आहे(Spain: Roman Gold Coins in Sea). ही नाणी सुमारे दीड हजार वर्षांपूर्वीची असल्याचा अंदाज आहे.

    दिल्ली : समुद्राच्या निळ्याशार पाण्याखाली किती रहस्ये दडली आहेत, याची कल्पना न केलेलीच बरी. कारण समुद्रात सातत्याने काही ना काही तरी गूढ सापडतच असते. स्पेनच्या समुद्रात नुकताच सोन्याच्या नाण्यांचा खजिना सापडला आहे(Spain: Roman Gold Coins in Sea). ही नाणी सुमारे दीड हजार वर्षांपूर्वीची असल्याचा अंदाज आहे.

    स्पेनमधील अलिकांटे येथील समुद्राच्या या भागाला ‘लुई लेन्स’ आणि ‘सेजर जमिनो’ या नावाने ओळखले जाते. तेथेच हे दोन डायव्हर्स समुद्राच्या सुमारे 7 मीटर खोल तळाशी जाऊन कचरा काढत होते. यावेळी त्यांच्या हाताला सोन्याचे एक नाणे सापडले. हे नाणे 10 सेंटचे होते.

    त्या दोघांनी ते नाणे आपल्या जहाजात आणले. या नाण्यावर ग्रीक अथवा रोमन चेहरा दिसून आला. यामुळे या दोन्ही डायव्हर्सनी ज्या ठिकाणी नाणे सापडले तेथे पुन्हा डुबकी मारली. तेथे त्यांनी तब्बल दोन तास खोदाई केली. या खोदाईत त्यांना तब्बल 53 सोन्याची नाणी सापडली.